मुंबई :  ज्या वेळेस हृद्याला रक्तपुरवठा होण्याच्या कार्यामध्ये ब्लॉकेजेस किंवा इतर कारणांमुळे अडथळा येतो. तेव्हा हार्ट अटॅकचा धोका वाढतो. हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीला वेळीच मदत मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचवण्यास मदत होते. म्हणूनच ही मदत कशाप्रकारची असावी याबाबतचा खास सल्ला विख्यात हृद्यरोगतज्ञ डॉ. विजय सुरासे यांनी दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आल्यास नेमकी कोणती मदत कराल ?
छातीत वेदना जाणवणं हे हार्ट अटॅकचे एक प्रमुख लक्षण आहे. हृदयविकाराचा झटका आणि अ‍ॅसिडीटीमध्ये अनेकदा रुग्णाचा गोंधळ होतो. अशावेळेस रुग्णाच्या छातीत दुखत असल्यास त्याला आरामदायी स्थितीमध्ये ठेवा. कपडे सैलसर करा. तसेच खिडक्या उघड्या करा. त्यानंतर त्यांच्या जीभेखाली अ‍ॅस्प्रीनची गोळी ठेवा. मात्र अ‍ॅस्प्रीनसोबत पाणी देऊ नका. त्याऐवजी त्यांना गोळी चघळायला सांगा. अ‍ॅस्प्रीन ऐवजी तुम्ही sorbitrateची गोळीदेखील देऊ शकता. गोळी रुग्णाच्या जीभेखाली ठेवा. साधारण 5 मिनिटांच्या कालावधीमध्ये 3 sorbitrate गोळ्या देऊ शकता. अ‍ॅस्प्रीन आणि sorbitrate या दोन्ही गोळ्यांमध्ये anti-coagulant क्षमता असते. यामुळे रक्तातील गुठळ्या कमी होण्यास मदत होते. मात्र ज्या रुग्णांना खूप घाम असेल किंवा लो बीपीचा त्रास असेल त्यांना  sorbitrateच्या गोळ्या देऊ नका.


डॉ. सुरासे यांच्या सल्ल्यानुसार, रुग्णाला जमिनीवर सरळ झोपवू नका. त्यांना खूर्चीवर बसवा किंवा सोफ्यावर त्यांना मागे रेटून बसवा. त्यांना खोकायला सांगा. यामुळे फुफ्फुसातील श्वसनमार्ग खुला होण्यास मदत होईल. 
रुग्णाला हार्ट अटॅक आल्याचे समजताच त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची सोय करा. हृद्यविकाराच्या झटक्यानंतरचा एक तास हा golden hour समजला जातो. झटक्यानंतर हार्ट पंप होण्याची क्रिया मंदावते. त्याचा परिणाम इतर अवयवांवर होऊ शकतो. 


हृद्यविकाराच्या रुग्णांकरिता खास टीप्स
छातीत दुखत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. 
रुग्णाला आरामदायी आणि हवेशीर स्थितीत बसवा.
aspirin किंवा sorbitrate गोळ्या जवळ ठेवा.
हार्ट अटॅक आल्यानंतर तासाभरात रुग्णाला वैद्यकीय मिळेल याची सोय करा.