मुंबई | आपली त्वचा सुंदर असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पाणी प्यायल्याने आपल्या शरिराला अनेक फायदे होतात हे मात्र खर. पण जास्त पाणी पिणे हे सुद्धा आरोग्यास घातक ठरू शकते. त्वचेवर काही डाग असतील किंवा पेटाच्या काही समस्या असतील तर आपण पाण्याचे जास्त प्रमाणात सेवन करतो. पाणी हा प्रत्येक आजारावर रामबाण उपाय आहे. शरिरातील तापमान आणि पचनक्रियेसाठी पाणी अत्यंत लाभदायक आहे. परंतु जास्त पाणी पिण्यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. ज्यामध्ये लठ्ठपणा, रक्त प्रवाहाच्या समस्या यासारख्या गंभीर आजारांना सामोरे जाण्याची शक्यता असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जास्त पाणी प्यायल्याने होणारे तोटे
- अति प्रमाणात पाणी प्यायल्यास आरोग्य खराब होण्याची शक्यता असते.


- ताप आल्यावर, काम जास्त केल्यावर, उष्ण वातावरणामध्ये, केस गळत असल्यास, तणाव असल्यास अशा वेळी पाणी जास्त पिऊ नये. शरीरासाठी हानिकारक असते.


- रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यास सर्दी-ताप होण्याची शक्यता असते.


- बायपास झालेल्या व्यक्तीने पाणी कमी प्यावे.


- जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने फॅट वाढते.


तज्ञांचा असा विश्वास आहे की, जास्त पाणी पिण्यामुळे स्नायूंवर जास्त भार पडतो, त्यामुळे रक्त प्रवाहाच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून, दिवसाला किमान २ ते ४ लिटर पाणी प्यावे.