7 दिवस उपाशी पोटी हे ड्रिंक प्या...चरबी घटवण्यासाठी फायदेशीर
लठ्ठपणा इतर अनेक गंभीर आजारांचं कारण बनतं.
मुंबई : व्यस्त आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेकांना लठ्ठपणाची समस्या उद्भवते. लठ्ठपणा इतर अनेक गंभीर आजारांचं कारण बनतं. आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, लठ्ठपणा ही अशी अवस्था आहे ज्यामध्ये एखाद्याचं वजन इतकं वाढतं की यामुळे त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ लागतो. जेव्हा एखादी व्यक्ती आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरी वापरते, तेव्हा या अतिरिक्त कॅलरीज चरबीच्या स्वरूपात शरीरात साठण्यास सुरु होते.
कॅलरीयुक्त, जंक फूड याचं अधिक सेवन तसंच फळं आणि भाज्यांचा आहारात कमी समावेश केल्याने स्थूलपणाची तक्रार समोर येते. जर तुम्ही देखील स्थूलतेने त्रस्त असाल आणि वजन घटवण्याची तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण डाएट करतात. त्याचप्रमाणे काही प्रकारची पेयं आहेत जी तुम्हाला वजन कमी करण्यात मदत करू शकेल. आयुर्वेद डॉक्टर अबरार मुलतानी यांनी हे पेय तयार करण्याची पद्धत आणि त्याचे फायदे सांगितले आहेत.
वजन कमी करण्यासाठी असं ड्रिंक तयार आहे.
आपल्याला 1 काकडी, 1 चमचा आल्याचा रस आणि 1 लिंबाचा तसंच 20 ग्रॅम पुदीना घ्यावा लागेल.
आता हे सर्व एका ग्लास पाण्यात घेऊन मिक्सरमध्ये मिसळा आणि रस बनवा.
आता 7 ग्लासांमध्ये चांगलं पाणी घेऊन या ज्यूसला प्रत्येक ग्लासात बरोबर मात्रेत मिसळा
रात्रभर ठेवल्यानंतर सकाळी उठून एक ग्लास पाणी प्या.
सलग 7 दिवस तुम्हाला हे पाणी प्यायचं आहे
यानंतर तुम्ही तुमचं वजनाची नोंद करा
डॉक्टरांनी सांगितले या ड्रिंकचे फायदे
डॉक्टर अबरार मुलतानी म्हणतात की, हे पेय आपले शरीर डिटॉक्सिफाई करतं आणि चरबी निघून टाकण्यास मदत करते. त्याचप्रमाणे, ते चयापचय क्रिया वाढवतं आणि पचन सुधारतं. या पेयाचा बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत मिळते.
डॉ. मुल्तानी यांच्या सांगण्यानुसार, ज्यांना नाकातून रक्तस्राव होणं, पाईल्स, पोटातील अल्सर यांचा त्रास असलेल्या व्यक्तींनी या ज्यूसचं सेवन करू नये. त्याचप्रमाणे गरोदर महिलांनीही हे ड्रिंक पिऊ नये.