मुंबई : टोमॅटो हा भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये हमखास वापरला जाणारा पदार्थ आहे. भाजीपासून सूप आणि सलाडमध्येही टोमॅटो प्रामुख्याने वापरला जातो. केवळ पदार्थांची चव वाढवण्यासाठी नव्हे तर काही आरोग्यदायी फायद्यांसाठीही आहारात टोमॅटोचा समावेश करणं फायदेशीर आहे.  


 टोमॅटोमधील फायदेशीर घटक  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, लाईकोपीन, पोटॅशियम हे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. टोमॅटोमुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. सोबतच टोमॅटोमुळे कोलेस्ट्रेरॉल कमी होण्यास मदत होते. सकाळ संध्याकाळ टोमॅटोच्या रसाचे सेवन केल्यास लठ्ठपणची समस्या आटोक्यात ठेवण्यास मदत होते. पचनक्रियाही सुधारते.  


 पोटातील जंतूचा करतात नाश  


 पोटात जंत होण्याचा त्रास लहान मुलांमध्ये प्रामुख्याने आढळतो. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी सकाळी टोमॅटोच्या रसामध्ये काळामिरीची पूड मिसळून पिणं फायदेशीर ठरते. या घरगुती उपायाने पोटातील जंताचा त्रास कमी होतो. लहान मुलांच्या शारिरीक वाढीसाठीदेखील टोमॅटो फायदेशीर ठरतो. टोमॅटोच्या नियमित सेवनाने डोळ्यांचे, मूत्राशी संबंधित काही समस्या, बद्धकोष्ठता आणि मधूमेहाच्या रूग्णांना फायदा होतो.