मद्यपानाचे शरीरावर हे होतात वाईट परिणाम
मद्यपानामुळे शरीरावर वाईट परिणाम होतात, यात मेंदूवर सर्वात जास्त परिणाम होतो, शांत झोप येत नाही.
मुंबई : मद्यपानामुळे शरीरावर वाईट परिणाम होतात, यात मेंदूवर सर्वात जास्त परिणाम होतो, शांत झोप येत नाही. डायरिया तसेच छातीत जळजळीचे प्रमाण वाढते, स्वादूपिंडावर परिणाम होतो. सातत्याने लघवीला जाण्याचे प्रमाण वाढते.
मेंदूच्या कार्यात अडथळा
मद्यसेवनाच्या अवघ्या तीस सेकंदामध्ये यामधील घटक मेंदूपर्यंत पोहोचतात. यामुळे व्यक्तीचा मूड बदलू शकतो तसंच मेंदूचं संतुलनंही बिघडू शकतं. विचार कऱण्याच्या क्षमतेतही फरक पडतो. यामुळे स्मृतीवर देखील विपरीत परिणाम होतो
मेंदूचा आकार छोटा होतो
जर तुम्ही सतत अतिप्रमाणात मद्यपान करत असाल तर यामुळे तुमच्या मेंदूच्या आकारावर परिणाम होतो. मेंदूच्या पेशी बदलतात आणि त्यांचा आकार छोटा होतो. मेंदूचा आकार छोटा झाल्याने विचार करण्याची क्षमता, स्मृती आणि शिकण्याची क्षमता कमी होते. तसंच मेंदू शरीराचं तापमानही नियंत्रणात ठेऊ शकत नाही
शांत झोप मिळत नाही
दारूच्या सेवनाने ज्या प्रमाणे मेंदूवर परिणाम होतो तसाच झोपेवरही होतो. अतिप्रमाणात दारू प्यायल्याने तुम्हाला शांत झोप लागू शकत नाही. पुरेशी झोप न मिळाल्याने चिडचिडेपणातही वाढ होते.
डायरिया आणि छातीत जळजळ
अतिप्रमाणात मदयपान केल्याने छोटं आतडं आणि मोठं आतडं यांच्यावर परिणाम होतो. यामुळे डायरिया सारखे दीर्घकालीन आजार संभवतात. शिवाय मद्यपानामुळे छातीत जळजळण्याच्या प्रमाणातही वाढ होते.
सातत्याने लघवीला होणं
मानवी शरीरात असे हार्मोन्स असतात जे किडनी अधिक प्रमाणात लघवी तयार करण्यासाठी रोखतात. मात्र मद्यापानाच्या सेवनाने या हार्मोन्सवर परिणाम होतो. आणि व्यक्तीला सातत्याने लघवीला जाण्याची समस्या निर्माण होते. अनेकदा अतिपद्यपान आणि कामाचा ताण-तणाव यामुळे लोकांच्या किडनीवर देखील विपरीत परिणाम होतो.
स्वादुपिंडावर परिणाम
मद्यापानाच्या अतिसेवनामुळे स्वादुपिंड खराब होण्याची शक्यता असते. मद्यपानातून शरीरात जाणारं केमिक्लस स्वादुपिंडात टॉक्सिनसोबत अडकतं. ज्यामुळे स्वादुपिंड योग्यरित्या कार्यरत न राहता पुरेशा प्रमाणात इन्सुलिन तयार करत नाही. ज्यामुळे मधुमेहासारखा गंभीर आजार होऊ शकतो.
रोगप्रतिकारक प्रणालीवर कमकुवत होते
रात्रीच्या मद्यपानाच्या सेवनामुळे सर्दी होण्याची शक्यता असते. कारण दारू ही रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करते. यावेळी आपलं शरीर जंतूशी लढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पांढऱ्या रक्तपेशी तयार करत नाही. त्यामुळे मद्यपाने केल्याच्या 24 तासानंतर तुम्ही आजारी पडण्याची दाट शक्यता असते.