Fruit Shake प्यायला आवडतं? मग आधी त्याबाबत काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं
बातमी वाचून तुमच्या मनात असाच विचार येत असेल की, असं का? चला तर मग आम्ही तुम्हाला याबद्दल काही माहिती सांगणार आहोत.
मुंबई : फळं शरीरासाठी चांगले असतात. म्हणून तर डॉक्टर देखील आपल्याला ते खाण्याचा सल्ला देतात. यामुळे शरीराला गरजेचे असणारे, विटामीन आणि मिनरल्स मिळतात. परंतु काही लोक डायरेक्ट फळं न खाता त्याचा ज्युस किंवा शेक बनवून पितात. ज्यामुळे पोट देखील भरलेलं राहातं. ज्याला आपण बऱ्याचदा शरीरासाठी आरोग्यदायी आणि फायदेशीर असल्याचं मानतो. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण आयुर्वेदानुसार फ्रूट शेकमुळे आपल्याला फायदा होत नाही तर उलट हानीच होते.
लोकांचे सर्वात आवडते फ्रुट शेक म्हणजे मँगो शेक आणि बनाना शेक, जे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात आणि हेच शेक बऱ्याचदा आरोग्याला हानी पोहोचवतात.
बातमी वाचून तुमच्या मनात असाच विचार येत असेल की, असं का? चला तर मग आम्ही तुम्हाला याबद्दल काही माहिती सांगणार आहोत.
आयुर्वेदात फळे आणि दूध मिसळण्यास मनाई आहे
आयुर्वेदानुसार दूध आणि फळांच्या मिश्रणाचे सेवन करण्यास मनाई आहे. हे मिश्रण एकत्र न घेण्याचे कारण म्हणजे दूध आणि फळ दोन्हीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जर आपण ते घेतले तर त्याचा आपल्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. यासोबतच शरीराच्या वेगवेगळ्या भागात दुखण्याची समस्याही होऊ शकते. त्यामुळे फ्रुट शेक पिणं टाळा.
आयुर्वेदानुसार सर्व फळांमध्ये सायट्रिक ऍसिड कमी-अधिक प्रमाणात असते. सायट्रिक ऍसिडच्या संपर्कात आल्यावर दूध फुटते. किंवा त्याऐवजी, सायट्रिक ऍसिड दूध फाडण्याचे कार्य करते. यासोबतच फळांमध्ये काही अॅसिडही असतात, जे दुधात मिसळताच तुमच्या शरीराला हानी पोहोचवू शकतात.
फळांमध्ये असे रासायनिक घटक असतात, जे दुधाने पचवता येत नाहीत. त्यामुळे मँगो शेक आणि बनाना शेक पिऊ नये. असे सतत केल्याने तुम्हाला भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
आंबा, तसेच दूध हे आरोग्याचा खजिना आहे, असे वडिलधाऱ्यांकडून तुम्ही अनेकदा ऐकले असेल. परंतु हे खरं असलं तरी त्या दोघांना एकत्र करुन प्यायल्याने फायद्या ऐवजी नुकसानच आहे. त्यामुळे कोणतेही फळ खाल्ल्यानंतर किमान 1 ते 2 तासांनंतरच दूध प्यावे. असे केल्याने तुम्हाला दूध आणि फळे या दोन्हीच्या गुणधर्माचा फायदा होतो.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)