तुम्ही चहासोबत फरसाण खाता! आरोग्यावर काय परिणाम होतो? जाणून घ्या
बहुतेक लोक चहाबरोबर उत्साहाने फरसाण खातात. पण यामुळे आरोग्याचे किती नुकसान होऊ शकते हे तुम्हाला माहिती आहे का?
Drinking Tea With Namkeen Side Effects: चहाचं नुसतं नाव जरी काढलं तरी मरगळलेल्या व्यक्तीला उत्साह येतो. कारण चहाच्या प्रत्येक घोटामुळे तरतरी येते. चहा पिण्याऱ्यांची संख्या पाहता प्रत्येक नाक्यावर एकतरी चहाची टपरी असतेच असते. जवळपास प्रत्येक घरात दिवसाची सुरुवातच चहाने होते. त्यानंतर इतर कामं केली जातात. चहाची तल्लफ आली म्हणून किंवा नाश्ता झाला की, चहा पिणं अगदी सामान्य आहे. बहुतेक लोक चहाबरोबर उत्साहाने फरसाण खातात. पण यामुळे आरोग्याचे किती नुकसान होऊ शकते हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला चहा आणि फरसाण एकत्र खायला आवडत असेल, परंतु त्याचे वाईट परिणाम होतात आणि तुमचे आरोग्य बिघडू शकते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत फरसाण आणि चहा एकत्र घेतल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, चला जाणून घेऊया.
मीठ आणि दूध एकत्र खाऊ नका: चहामध्ये दूध असते आणि त्यासोबत फरसाणचे सेवन हानिकारक मानले जाते. फरसाण तेलकट आणि खारट असतं, तसेच पचायला खूप वेळ लागतो. त्यामुळे फरसाण आणि चहा एकत्र घेतल्यास पोटात दुखू शकते. त्यामुळे दुधाच्या पदार्थांसोबत फरसाण अर्थात खारट पदार्थांचे सेवन करू नये.
अॅसिडिटीची समस्या: फरसाणमध्ये शेंगदाणे असल्यास चहासोबत सेवन करू नये. शेंगदाणे आणि ड्रायफ्रुट्ससोबत चहा प्यायल्यास अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. फरसाणमधील ड्रायफ्रूट्स तेलात तळलेले असतात आणि चहासोबत घेऊ नये.
डायरिया: चहासोबत शेंगदाणे किंवा फरसाणचे सेवन केल्यास डायरिया होऊ शकतो. चहामध्ये टॅनिन असते आणि काही स्नॅक्समध्ये लोह असते. या मिश्रणामुळे पोट खराब होऊ शकते. कारण फरसाणमध्ये खडे मसाले आणि तेल वापरले जाते. चहासोबत त्याचे सेवन केल्याने त्रास होऊ शकतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. त्याचा अवलंब करण्यापूर्वी, वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)