Drumstick : शेवग्याची शेंग आपण सांबर किंवा डाळीत घालून खातो. शेवग्याच्या शेंगेनं जेवणाला एक वेगळीच चव येते. काही लोकांना शेवग्याची शेंग खाणं आवडत नाही. तर हेच लोक जेवणातही शेवग्याची शेंग घालत नाहीत. मात्र, तुम्हाला माहितीये का? शेवग्याची शेंगमध्ये सगळ्यात जास्त औषधी गुणधर्म आहेत. फक्त शेवग्याच्या शेंगा नाहीत तर त्याच्या पानांची भाजी देखील बनवण्यात येते. शेवग्याच्या शेंगेत सहजन विटामिन सी, विटामिन ई, कॅल्शियम, पोटॅशियम आणि आयरन मोठ्या प्रमाणात असतात. चला तर मग जाणून घेऊया शेवग्याची शेंग खाण्याचे फायदे... ( Benefits of Drumstick )


शेवग्याची शेंग खाण्याचे फायदे - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रक्तदाब नियंत्रित करा (Drumstick for blood pressure) 
आजकाल उच्च रक्तदाबचे खूप जास्त रुग्ण आढळतात. याचे कारण आपलं बदललेलं जीवन आणि आहार आहे. यासोबत कोणत्याही गोष्टीवर खूप जास्त विचार केल्यामुळे देखील ही समस्या होते. मग आता शेवग्याच्या शेंगचे सेवन केले तर आपल्याला यातून सुटका मिळू शकते. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी शेवग्याच्या शेंग सगळ्यात फायदेशीर ठरू शकते. यात असलेले मॅग्नेशियम रक्तवाहिन्या निरोगी बनवण्याचे काम करते. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तदाब वाढत नाही.


त्वचेसाठी फायदेशीर (Drumstick for Skin)


शेवग्याची शेंग खाल्यानं त्वचेला अनेक फायदे होतात. कारण शेवग्याच्या शेंगेत व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि फॉलिक अ‍ॅसिड सारखे पोषक घटक आढळतात ज्यामुळे त्वेचा ग्लोइंग दिसते. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स देखील येत नाहीत. 


मधुमेहापासून सुटका पाहिजे तर करा शेवग्याच्या शेंगचे सेवन (Drumstick for diabetes)


शेवग्याच्या शेंगमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात. यामध्ये असलेले पोषक तत्व मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. शेवग्याच्या शेंगचे सेवन केल्यानं रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. त्यामुळे इच्छा नसली तरी देखील शेवग्याची शेंगचा तुमच्या आहारात समावेश करा. 


सतत शरीरावर येणाऱ्या सूजेपासून सुटका (Drumstick for Swelling)


शेवग्याच्या शेंगमध्ये एण्टी इन्फ्लेमेटरी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. शेवग्याची शेंग खाल्ल्यानं अंग दुखी आणि सूज येण्याची समस्या दूर होते. जो अवयव दुखत असेल तेथे शेवग्याच्या शेंगची पाने लावल्यानं सूज आणि दुखणे देखील जाते. 


हृदयासाठी फायदेशीर (Drumstick for Heart)


शेवग्याच्या शेंगमध्ये आढळणारे पोषक घटकांमुळे हृदयाला अनेक फायदे होता. शेवग्याच्या शेंगच्या झाडाच्या पानामध्ये बायोएक्टिव्ह संयुगेचे गुणधर्म असतात. हे खाल्ल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका दूर राहतो.


थायरॉईड नियंत्रित करा (Drumstick for Thyroid) 
ज्या लोकांना थायरॉईड आहे त्यांनी त्यांच्या आहारात शेवग्याच्या शेंगचा समावेश केला पाहिजे. असे केल्यानं थायरॉईड हार्मोन्स हे नियंत्रणात येतात.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)