मुंबई : आजकाल वजन कमी करण्याचा फास्टिंग हा खूप सोपा मार्ग आहे. या फास्टिंगच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटींनी वजनही कमी केलं. पण तुम्ही ड्राय फास्टिंग कधी ऐकलं आहे का? होय, वजन कमी करण्यासाठी हा देखील एक प्रकारचा उपवास आहे. मात्र हे फास्टिंग खरंच फायदेशीर आहे का?


ड्राय फास्टिंगचे अनेक प्रकार आहेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साधारणपणे ड्राय फास्टिंगचे दोन प्रकारचे असतात - सॉफ्ट ड्राय फास्ट आणि हार्ड ड्राय फास्ट.


सॉफ्ट ड्राय फास्ट


सॉफ्ट ड्राय फास्टमध्ये, डाएटर्सना दात घासण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी आणि त्यांचे चेहरे धुण्यासाठी पाणी वापरण्याची परवानगी आहे.


हार्ड ड्राय फास्ट


यामध्ये डायट करणाऱ्यांना पाण्याच्या संपर्कात येण्याची अजिबात परवानगी नसते.


कसं काम करतं हे फास्टिंग?


रिपोर्ट्सनुसार, असं म्हटलं जातं की, जेव्हा ड्राय फास्टमध्ये शरीराला पाणी मिळत नाही, तेव्हा ते ऊर्जा निर्माण करण्यासाठी चरबी जाळण्यास सुरुवात करतं. शरीरातील पाण्याची कमतरता यावर जोर देते आणि अंतर्गत प्रणाली चालू ठेवण्यासाठी उपलब्ध उर्जेचा प्रत्येक स्रोत वापरण्यास सुरुवात करते. 


दुसरीकडे असंही म्हटलं जातं की, ड्राय फास्ट खराब झालेल्या पेशी काढून रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते, ज्यामुळे शरीर नवीन पेशी तयार करू शकते. याव्यतिरिक्त, वारंवार उपवास केल्याने जळजळ कमी होते आणि निरोगी त्वचेला प्रोत्साहन मिळते.


इंटरमिटेंट फास्टिंग आणि ड्राय फास्टिंग यात फरक


इंटरमिटेंट फास्टिंग करताना, आपण आहारात शून्य कॅलरी असलेलं द्रव पेय समाविष्ट करू शकता. जसं पाणी, अॅपल सायडर व्हिनेगर. या सर्व गोष्टी उपवासाच्या वेळी प्यायल्या जाऊ शकतात. तर ड्राय फास्टिंगमध्ये, उपवासाच्या वेळी तुम्हाला खाण्यापिण्यापासून पूर्णपणे दूर राहावं लागतं. हा प्रकार अत्यंत धोकादायक मानला जातो. परंतु काही तज्ज्ञ या हे फास्टिंग फायदेशीर असल्याचं म्हणतात.