लहान मुलांसह मोठ्या संख्येने लोकांना ॲसिडीटी, अपचन, मळमळ आणि उलट्या, बद्धकोष्ठता, पोटदुखी, अतिसार, गॅस्ट्रोएन्टेरिटिस, गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स डिसीज (GERD), आणि पावसाळ्यात सूज येणे यांचा त्रास होतो. यावेळी पावसाळ्यात जठरासंबंधी समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि आतडे निरोगी ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घ्यावी, हे जाणून घेऊया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबईतील पोट विकार तज्ज्ञ, हेपॅटोलॉजिस्ट आणि थेरप्यूटिक एंडोस्कोपिस्ट डॉ. रावसाहेब राठोड यांच्या सांगण्यानुसार, पावसाळ्यातील वाढत्या आर्द्रतेमुळे पचनक्रिया मंदावते. त्यामुळे, एखाद्याची पचनसंस्था मंदावते आणि पावसाळ्यात अशा प्रकारे पचनाच्या समस्यांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येते. दूषित अन्न आणि पाण्यामुळे गॅस्ट्रोएन्टेरिटिस होऊ शकतो जो पोट आणि आतड्यांसंबंधीत दाह निर्माण करतो. याशिवाय पोटदुखी आणि वेदना, पोटफुगणे, मळमळ आणि उलट्या, बद्धकोष्ठता,ॲसिडिटी, गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिसीज (GERD),अतिसार यांचा त्रास होऊ शकतो.जंतू आणि जिवाणू असलेले उघड्यावरील पदार्थ किंवा शिळे अन्न खाल्ल्याने मुलांना विषबाधा होण्याची दाट शक्यता असते. पावसाळ्यात आतडे मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी या महत्त्वपूर्ण उपायांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.


पावसाळ्यात पोटासंबंधी समस्या टाळण्यासाठी टिप्स :


  • उकळलेल्या पाण्याचे सेवन करा. पावसाळ्यात थेट नळाचे पाणी पिणे चांगले नाही कारण ते दूषित असू शकते. जेव्हा तुम्हाला घराबाहेर पडायचे असेल तेव्हा सोबत उकळलेले पाणी बाळगा. वॉटर प्युरिफायरचा वापर करा आणि दररोज किमान 12-14 ग्लास पाणी प्या.

  • आहारात प्रोबायोटिक्सचा समावेश करा. तुमच्या आहारात दही, ताक यांचा समावेश करा.

  • कच्च्या भाज्या खाऊ नका.तुम्ही तुमच्या सॅलडसाठी वापरत असलेल्या कच्च्या भाज्यांमध्ये बॅक्टेरिया आणि विषाणू असू शकतात ज्यामुळे तुम्हाला पोटासंबंधीत संसर्ग होण्याची शक्यता असते. भाज्या नीट शिजवून मग त्यांचे सेवन करणं योग्य राहील. शिवाय पावसाळ्यात सीफूड्सचं सेवन करणं देखील योग्य नाही कारण यामुळे पोटाचा त्रास होऊ शकतो.

  • अस्वच्छ परिसरात तयार केलेले आणि उघड्यावरील दूषित अन्नाचे सेवन टाळा.तळलेले आणि मसालेदार पदार्थांच्या सेवनाने पचन प्रक्रियेत व्यत्यय येऊ शकतो.

  • हलका आहार घ्या तसेच घरी शिजवलेल्या ताज्या अन्नाचे सेवन करा ज्यामध्ये कमीत कमी तेल असते आणि ते स्वच्छतेचे पालन करुन तयार केलेले असते.फळे आणि भाज्या पाण्याने स्वच्छ धुवा आणि मगच त्यांचा वापर करा.

  • बेकरीतील मैद्याचे पदार्थ, मिठाई, कँडीज आणि सोडियमयुक्त पेय आणि तुमच्या आतड्याच्या आरोग्यावर दुष्परिणाम करते. हे खाद्यपदार्थ आणि सोडियमयुक्त पेय तुमच्या आतड्यास त्रासदायक ठरु शकतात.

  • दमट वातावरणात अन्न साठवल्यास ते दूषित आणि खराब होऊ शकते. म्हणून अन्न साठवताना थंड आणि कोरड्या ठिकाणी साठविल्याची खात्री करा.