कानात मळ जमणं हि तशी पहिली तर अगदी सामान्य गोष्ट. कानात मळ साठला कि आपल्याला त्रास होतो म्हणून कान वेळोवेळी साफ कारण खुप महत्वाचं समजलं जात. पण काही जण याकडे दुर्लक्ष करतात आणि मग कानात खाज येणे जळजळ होणे अश्या त्रासाला आपल्याला समोर जावं लागत.
 कां चुकीच्या पद्धतीने किंवा टोकदार गोष्टीने साफ करण्याचा कधीच प्रयत्न करू   इजा होऊ शकते कारण कानाचा पडदा खूप पातळ असतो त्यामुळे कां साफ करताना अतिशय हळुवारपणे आणि काही सांगिल्याप्रमाणे च करावा असं म्हटलं जात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्दतीने कान साफ करू शकता चला तर मग जाणून घेऊया अश्याच काही घरगुती आणि सोप्या पद्धतींविषयी.



1 - कोमट पाणी : कापसाचा बोळा  घ्या पाण्यात भिजवा आणि त्याच्या मदतीने पाणी कानात टाका. यांनतर एका पायावर उभे राहून उद्या मारत हे पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करा.


2 - हायड्रोजन पॅरॉक्साइड :  कमी प्रमाणात हायड्रोजन पराक्साइड घ्या आता ते पाण्यात मिसळा हे मिश्रण कानात थेम्ब थेम्ब घाला मात्र याच प्रमाण कमी असावं हे लक्षात ठेवा. आता का उलटून ते बाहेर काढा.


घेवून तो पाण्यात टाका. थोड्या प्रमाणात ते कानात टाका आणि आता कान उलटून काही सेकंदात ते बाहेर काढा.
 
3 -  तेल : ऑलिव्ह ऑइल , शेंगदाणा तेल किंवा मग मोहरीचं तेल गरम करून कानात टाकणे हा देखील सोपा उपाय आहे . यावेळी तेलात थोडा लसूण टाकलात तरी चालेल याने कानातलं मळ बाहेर येतो.


4 -  कांद्याचा रस : एक कांडा घ्या तो वाफेवर शिजवून घ्या,  याचा रस काढा यानंतर कापसाच्या बोळ्याने हा रस कानात थेम्ब थेम्ब घाला याने मळ बाहेर पडेल


5 -  मिठाचे पाणी : गरम पाण्यात मीठ घोळून टाकून त्याचे काही थेंब कानात टाका आणि काही सेकंदात ते बाहेर काढा.


वरील उपाय करून पहा आणि कानातील मळ साफ करा. मात्र हे सर्व उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.


( टीप : वरील माहिती माहितीच्या आधारावर आहे झी २४ तास याची खातरजमा करत नाही)