मुंबई : आपल्याला कितीही चांगलं स्वयंपाक बनवता येत असला, तरी तो पदार्थ बनवणाऱ्याच्या हाताची चव त्या पदार्थामध्ये उतरते. प्रत्येकाला सर्वात कठीण वाटतात त्या म्हणजे पोळ्या. प्रत्येकांचा पोळ्यांची चव वेगळी असते. काहींच्या पोळ्या लुसलुशीत होतात तर काहींच्या कडक होतात. पोळ्या करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे . तर आज जाणून घेवू पोळ्या थंड झाल्या तरी त्या कशा लुसलुशीत राहतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- पोळ्या करताना पिठ आणि पाण्याचे प्रमाण यावर विशेष लक्ष द्या. जर तुम्ही एक वाटी पिठ घेत असाल तर फक्त अर्धी वाटी पाणी घेवून पिठ व्यवस्थित मळून घ्या. यामध्ये चिमूटभर मिठ घालायला विसरू नका. 


- पिठ चाळून घेणं देखील तितकचं महत्त्वाचं आहे. कारण त्यामध्ये असेलेला कोंडा बाजूला होतो.


- पोळ्या बनवण्यासाठी लुसलुशीत पिठ मळलं जातं कारण पोळ्या नरम आणि सॉफ्ट होतात. 


- पिठ मळण्यासाठी  एक परात ध्या. त्यामध्ये पिठ घ्या.  पिठामध्ये एक खड्डा करा. त्या खड्ड्यामध्ये पाणी घाला. त्यानंतर पिठ मळून घ्या. गरजेनुसार त्यामध्ये थोडे-थोडे पाणी घालत राहा. 


- पिठ मळत असतााना, तो परातीला आणि हाताला चिटकू नये अशा प्रकारे पिठ मळून घ्या. 


- मळलेलं पिठ मऊ असावे जेणेकरून ते सहज बोटाने दाबले जाऊ शकते.


- मळलेल्या पिठावर तूप किंवा तेल लावून 15 ते 20 मिनिटं एका कपड्यात झाकून ठेवा. यामुळे पिठ कोरडं होणार नाही. 
 
- ठाराविक वेळेनंतर पुन्हा पोळ्याचं पिठ मळून घ्या. पिठाचा एक गोळा घ्या, तो पिठाचा गोळा कोरड्या पिठामध्ये टाकून घ्या. 


- पोळी लाटून झाल्यानंतर तिला जास्त वेळ ठेवू नका. असं केल्यास पोळी फुगत नाही. 


- सर्वप्रथम तवा गरम आचेवर तापवून घ्य. त्यानंतर मंद आचेवर पोळ्या तव्यावर शेकवून घ्या. 


- तव्यावर पोळी ठेवल्यानंतर 30 सेकेंदानंतर दुसऱ्या बाजूने शेकून घ्या. 


- जर मंद आचेवर पळ्या शेकल्या तर जस्त वेळ नरम राहातील. 


- काही लोक पोळ्या नरम करण्यासाठी पिठामध्ये दही किंवा दूध घालतात.