मुंबई : शरीराचा सुडौल बांधा ठेवायचा असेल तर समतोल आहार घेणं फार गरजेचं आहे. आहार नेहमी एकांतात केल्यास आरोग्यास त्याचे अनेक फायदे होतात. मित्र, पाहुण्यांसोबत आहार घेतल्यास आपण अधिक भोजन करतो. अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार असे म्हटले आहे की सामाजिकरित्या भोजन केल्यास आपण जास्त खातो. तेच जर आपण एकांतात भोजन केल्यास कमी खातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटनमधील बर्मिंघम युनिव्हर्सिटीचे संशोधक हेलन रुडॉक म्हणाले की, एखादा व्यक्ती जर एकट्यात जेवत असेल तर तो कमी खातो, तेच जर तो आपल्या कुटुंबासोबत जेवत असेल तर तो जास्त खातो.'


मागील अहवालात असे साध्य झाले की, एकांतात भोजन करणाऱ्यांच्या तुलनेत दुसऱ्यांसोबत भोजन केल्यास ४८ टक्के जास्त खाण्यात येत. अहवालात असे स्पष्ट झाले की, मित्र आणि कुटुंबासोबत जेवल्यामुळे आनंद मिळतो. त्यामुळे नकळत जास्त जेवन होते. 


त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर काही दिवस एकत्र जेवन करणं टाळा.