मुंबई :  लोकांना तोंडावर हाथ ठेवून बोलताना तुम्ही पाहिल असेल. बरेचजण आपल्या श्वासाची दुर्गंधी लपविण्यासाठी अस करत असतात. अनेकजण आपल्या जवळ येऊन बोलायला लागले की त्यांच्या तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीमुळे बिचकायला होत. अशा लोकांपासून सर्वजण अंतर ठेवून बोलण पसंद करतात. त्यामूळे तोंडाची दुर्गंधी घालविण्याचे उपाय आपण जाणून घेऊया. तोंडाच्या स्वच्छतेची काळजी न घेण किंवा खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे तोंडाला दुर्गंधी येते. तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीला हॅलीटोसिस असे म्हणतात. श्वासातून येणाऱ्या दुर्गंधीचं कारण बऱ्याचदा जीभ, दात आणि हिरड्यांमध्ये जमलेला बॅक्टेरीयाचे कण असतात. त्यामूळे दररोज जीभ साफ ठेवण गरजेच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण काही खातो तेव्हा तोंडात राहिलेला बॅक्टेरिया लाळेसोबत मिळून भोजन आणि प्रोटीनला तोडते. या विघटन प्रक्रियेत जो गॅस बाहेर येतो तेच दुर्गंधीच कारण ठरत.


ब्रश करा 


दातांवर ब्रश,जीभेच्या स्वच्छतेसाठी धातु किंवा प्लास्टिक पट्टीचा वापर करता येईल. याशिवाय माऊथवॉशचा वापर केला जाऊ शकतो. 


दातांमध्ये गॅप असल्यास काही खाताना काळजी घ्यायला हवी. काही खाल्यानंतर चूळ नक्की भरा. सकाळ-संध्याकाळ ब्रश करण गरजेच आहे. 


लाळ कमी होण्याने तोंडातून जास्त बॅक्टेरीया येतो तसेच काहीजणांना नाकाऐवजी तोंडातून श्वास घेण्याची गरज असते. घरगूती उपाय करुन दुर्गंधी कमी होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेण गरजेच आहे. 


लहान वयापासून मुलांना दात स्वच्छतेची सवय लावायला हवी. चॉकलेट किंवा अन्य गोड पदार्थ दातात अडकून किड लागण्याचे प्रमाण मोठे असते.


च्युईंग गम जवळ ठेवा 


घराच्या बाहेर असाल आणि ब्रश करण शक्य नसेल तर च्युईंग गम जवळ ठेवा. त्याच्या सुगंधामुळे दुर्गंधी दबून जाते आणि लाळे सोबत च्युईंग गम मिसळल्याने सुंगधही निर्माण होतो. 


ताजी फळ आणि भाज्या खाल्याने दाताच्या हिरड्या मजबूत होतात. त्यामूळे जेवणात याचे प्रमाण वाढवा. पोट साफ ठेवा आणि दिवसाला कमीत कमी १० ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा.