5 अतिशय स्वस्त भाज्या खाऊन, कायम शुगर ठेवा डाऊन
या भाज्या तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू देत नाहीत. याशिवाय, या भाज्या तुमचा इन्सुलिन प्रतिसाद सुधारतात.
डायबेटीसमध्ये खाण्यापिण्याबाबत थोडासाही निष्काळजीपणा असेल तर त्याचा थेट परिणाम त्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर होतो. चुकीचे अन्न खाल्ल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी झपाट्याने वाढते. त्याच वेळी, इन्सुलिनच्या पातळीवर देखील याचा परिणाम होतो आणि पीडित व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्या (मधुमेह संबंधित गुंतागुंत) होऊ लागतात. साखरेचे प्रमाण वाढल्याने डोकेदुखी, थकवा आणि अस्वस्थता जाणवते. अशा परिस्थितीत, या 4 भाज्यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे कारण ते तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू देत नाहीत. याशिवाय, या भाज्या तुमचा इन्सुलिन प्रतिसाद सुधारतात. चला जाणून घेऊया या भाज्यांबद्दल.
ब्रोकोली
ब्रोकोली पौष्टिक असण्यासोबतच मधुमेह विरोधी देखील आहे. ब्रोकोली खाल्ल्याने तुमची शुगर लेव्हल राखण्यातही मदत होते. वास्तविक, ब्रोकोलीमध्ये आहारातील फायबर आणि क्रोमियम आढळतात, जे इंसुलिन प्रतिसाद सुधारतात आणि मधुमेहाशी संबंधित लक्षणे नियंत्रित करण्यास देखील मदत करतात.
पालक
पालकाची पाने मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. वास्तविक, पालकाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो. म्हणूनच, जेव्हा तुम्ही पालक खाता तेव्हा तुमची ग्लुकोजची पातळी हळूहळू वाढते. पालकामध्ये काही अँटिऑक्सिडंट्स देखील असतात जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे आणि रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी करण्याचे काम करतात.
भेंडी
भेंडीची भाजी किंवा भेंडीचं पानी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. डायबिटिस मॅनेजमेंट करण्यासाठी भेंडी अतिशय फायदेशीर ठरु शकते. भेंडीच्या भाजीमुळे शरीरात इन्सुलिन तयार होण्यास मदत होते. भेंडीची भाजी किंवा भरलेली भेंडी देखील तयार करु शकता.
कारले
कारले हे चवीला जरी कडू असले तरीही त्याचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असते. कारलं खाल्यामुळे शरीराला आवश्यक ते गुणधर्म मिळतात. ज्यामुळे विटामिन्स आणि मिनरल्स शुगर शरीरात वाढवण्यापासून रोखले जाते. कारले तुम्ही भाजी, भरीतच्या रुपात खाऊ शकता.
मेथी
मेथीमुळे शरीरातील ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते. एवढंच नव्हे तर मेथीचे पाणी प्यायल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण झपाट्याने कमी होते. ही मेथी तुम्ही भाजीच्या स्वरुपात किंवा पराठ्यांच्या स्वरुपातही खाऊ शकता.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)