मुंबई : कोरोनावर उपचार करण्यासाठी अनेक शास्त्रज्ज्ञ औषधं तयार करण्यावर भर देतायत. लवकरात लवकर यावर औषधं मिळणं गरजेचं आहे. त्यातच आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची एन्ट्री झाली आहे. या परिस्थितीत कोरोनाला रोखणारं च्युइंगम समोर आलं आहे. होय..आता च्युइंगम कोरोनाला रोखण्यासाठी मदत करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरीकन शास्त्रज्ञांनी यासंदर्भात काही प्रयोग केले आहेत. या प्रयोगांच्या आधारावर च्युइंगम खाल्ल्याने कोरोना बरा होता त्याचप्रमाणे त्याला रोखणंही शक्य होतं असा दावा करण्यात येतोय. 


अमेरीकेच्या पेनिसिल्वहानिया युनिव्हर्सिटीमधील अभ्यासकांनी याबाबत संशोधन केलं आहे. त्यांच्या अभ्यासानुसार, च्युइंगमच्या सेवनाने कोरोना रोखता येतो किंवा टाळता येतो. 


या अभ्यासकांच्या दाव्याप्रमाणे, च्युइंगम खात असताना 95 टक्के विषाणू हे तोंडातच अडकले जातात. ट्रॅप होतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग प्रसार होऊ शकत नाही. कोरोना होण्याच्या शक्यता कमीत कमी होत जातात.  


संशोधकांच्या म्हणण्यानुसार, कोरोना हा लाळेतून तसंच शिंकेतून प्रसारित होतो. त्या लाळेच्या विरोधात च्युइंगम एखाद्या जाळीचं काम करतो आणि त्यातून कोरोनाच्या विषाणूचा प्रसार रोखला जातो. च्युइंगममध्ये एससीई-2 प्रोटीन असतं जे पेशीच्या मुळापर्यंत जातं. कोरोनाचा विषाणूही पेशीमध्ये जातो पण तो एससीई-2 मध्ये मिसळतो. त्यातून तयार होणारा लोड च्युइंगम रोखू शकतो.


दरम्यान संशोधकांनी केलेला शोध हा अजून प्राथमिक टप्प्यात असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जातायत.