मुंबई : दिवसेंदिवस धकाधकीचे बनत चाललेले जीवन अनेक समस्यांना कारणीभूत ठरत आहे. अशा जीवनशैलीचा आपल्या लैंगिक आरोग्यावरही परिणाम होत आहे. दर सात जोडप्यांमागे एकामध्ये गर्भधारणेच्या प्रक्रियेमध्ये दोष आढळून येत आहेत. अर्धाहून अधिक वेळेस पुरूषांमध्ये दोष असण्याचे प्रमाण आढळले आहे. त्यावर उपाय म्हणून तुमच्या आहारात बदल करणं आवश्यक आहे. 


 सुकामेवा फायदेशीर  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, सुकामेवा आहारात घेतल्यास त्याचा आरोग्यावर अधिक सकारात्मक परिणाम होतो. पुरूषांमध्ये शुक्राणूंच्या कार्यावर आणि गुणवत्तेवर सुकामेव्याचे सेवन हे फायदेशीर ठरत आहे. नियमित 14 दिवस ज्या पुरूषांनी दोन मूठ अक्रोड, बदाम खाणं फायदेशीर ठरले. यामुळे शुक्राणूंचा दर्जा सुधारला सोबतच त्यांच्या प्रवाहाचाही वेग सुधारला. 


काय आहे संशोधकांचा दावा? 


संशोधकांनी पाश्चिमात्य देशांमध्ये 119 आरोग्यदायी पुरूषांवर एक प्रयोग केला. यामध्ये 18-35 वयोगटातील पुरूषांचे दोन गट करण्यात आले. एका समुहाला नियमित आहाराबरोबर 60 ग्राम  सुकामेवा तर दुसर्‍या समुहाला त्यांचा केवळ नियमित आहार देण्यात आला. या प्रयोगाच्या निष्कर्षानुसार, सुकामेवा खाणार्‍यांमध्ये शुक्राणूंच्या आहारात 14 %  शुक्राणूंच्या  आरोग्यात  सुधारणा झाली. तर त्यांच्या प्रवाहामध्ये सुमारे 6% सुधारणा झाली आहे. 


सुकामेव्यामध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड, अ‍ॅन्टी ऑक्सिडंट घटक मुबलक असतात. यामुळे त्यांच्या प्रजननक्षमतेमध्ये सुधारणा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. 


जगभरात आहार आणि प्रजननाक्षमतेवर विविध ठिकाणी संशोधन करण्यात आले आहे. त्यानुसार, आहारात सकारत्मक बदल करणं, धुम्रपान, मद्यपानापासून दूर राहणं आरोग्यासाठी अनेकप्रकारे फायदेशीर ठरते.