मुंबई : सकाळचा उत्तम आणि पौष्टिक नाश्ता म्हटलं की, अनेकांचं उत्तर हे ओट्स असतं. अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही याच पदार्थाने होते. तज्ज्ञांनी दिलेल्या डाएटमध्ये पण ओट्सचा प्रामुख्याने समावेश असतोच. शिवाय ओट्समधून शरीराला आवश्यक असणारे घटक मिळतात. सध्या बाजारात या ओट्सचे विविध फ्लेवर्स देखील उपलब्ध असतात. पाहूया ओट्सचे आपल्या शरीराला होणारे फायदे


रक्ताभिसरण सुधारतं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओट्समध्ये अँटीऑक्सिडंट असते. याचा उपयोग वाढलेला रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी होतो. शिवाय ओट्च्या सेवनाने रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यास मदत होते. ओट्समध्ये इतरही गुणधर्म असतात, ज्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते.


आरोग्यासाठी उपयुक्त


अनेकजण आपल्या आहारात ओटमीलचा वापर करतात. ओट्समध्ये शरीराला आवश्यक असणाऱ्या प्रमाणात प्रथिने, फायबर्स आणि फॅट्स असतात. त्यामुळे ओट्सचा आहारात समावेश करणे फायदेशीर असते.


हृदयरोगाचा धोका कमी होतो


ओट्सच्या सेवनाने शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. त्यामुळे याचा फायदा हृदयासंबंधीत आजारांवर मात्र करण्यासाठी होतो. तसेच यामध्ये अँटी-ऑक्सिडंट असल्याने अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.


साखर नियंत्रणात राहते


ओट्मध्ये बऱ्याच प्रमाणात फायबर आणि कार्बोहायड्रेटची मात्रा आढळून येते. ओट्स हे हळूहळू पचतात. यामुळे रक्तात ग्लुकोजचे प्रमाण वाढत नाही. आणि शरीरात असलेल्या साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.