आहारात `या` भाजीचा समावेश कराल तर दूर होईल `मूळव्याधी`ची समस्या !
मुळ्याच्या भाजीला असणार्या विशिष्ट आणि उग्र वासामुळे अनेकजण त्याचा आहारात समावेश करताना टाळाटाळ करतात.
मुंबई : मुळ्याच्या भाजीला असणार्या विशिष्ट आणि उग्र वासामुळे अनेकजण त्याचा आहारात समावेश करताना टाळाटाळ करतात.परंतू भाजी, रायता, पराठा अशा विविध आणि रुचकर माध्यमातून मूळा आहारात घेता येऊ शकतो. मूळव्याधसारख्या पचनाच्या विकारांमध्ये मूळा अत्यंत फायदेशीर ठरतो. मधूमेहींच्या आहारात 'ही' एक भाजी असणं ठरू शकते बहूपयोगी !
कसा ठरतो मूळा फायदेशीर ?
मुळ्यामध्ये डायटरी फायबर्स मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. यामुळे पचनकार्य सुधारते तसेच शौचाला साफ होण्यास मदत होते. यासोबतच मुळ्यामध्ये व्हिटामिन सी आणि मेटॅबॉलिटीस आढळतात. यामुळे मूळव्याधीत होणार्या वेदना कमी होण्यास मदत होते.
मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत वेदनादायी असतो. अशावेळी सूज,खाज येणे, तीव्र वेदना होणे या समस्यांपासूनही आराम मिळवण्यासाठी मुळ्यातील तेल (volatile oils) फायदेशीर ठरते. म्हणूनच औषधोपचारांसोबत मूळव्याधीचा त्रास नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी मूळा अधिक फायदेशीर ठरतो.
कसा कराल आहारात मुळ्याचा समावेश ?
मूळा हा लाल आणि पांढर्या रंगामध्ये आढळतो. परंतू सर्वत्र सहजपणे पांढर्या रंगाचा मुळा आढळतो. त्यामुळे त्याचा आहारात समावेश करा. मूळव्याधीच्या त्रासाच्या तीव्रतेनुसार त्याचा वापर अवलंबून असतो.
#1 सुरवातीच्या टप्प्यावरील वेदना कमी करण्यासाठी :
100 मिली ग्रॅम किसलेल्या मुळ्यामध्ये एक टीस्पून मध मिसळा. हे मिश्रण नीट एकत्र करून दिवसातून दोनदा खाल्ल्यास वेदना कमी होण्यास मदत होते. यामुळे गुद्दवाराजवळ खाज येणे व बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होईल. याऐवजी ग्लासभर मूळ्याच्या रसामध्ये चिमूटभर मीठ मिसळून दिवसातून दोनदा प्या. यामुळेदेखील मूळव्याधीचा त्रास कमी होण्यास मदत होईल.
#2 वेदना आणि सूज कमी करण्यसाठी :
किसलेला मूळा आणि दूध एकत्र करून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट इंन्फेक्टेड भागावर लावा. म्हणजे सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होईल.