उन्हाळ्यात फीट राहण्यासाठी खा हे सलाड, जाणून घ्या रेसिपी
Vegetable Salad : उन्हाळा सुरु झाल्याने मसालेदार अन्न खाण्याऐवजी सलाडवर अनेकांचा अधिक भर असतो.
Vegetable Salad : उन्हाळा सुरु झाल्याने शरीराची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. उन्हाळ्यात आहारात काही गोष्टींचा समावेश करणं गरजेचं आहे. जेणेकरुन तुम्हाला फीट राहता येईल. फळे असो किंवा कच्च्या भाज्या यामध्ये भरपूर पोषकतत्व असतात. रोजच्या आहारात याचा समावेश केल्यास शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासत नाही. (Vegetable Salad Recipe)
उन्हाळ्यात, जर तुम्हाला मसालेदार अन्न खाण्याची इच्छा होत नसेल आणि हलका आहार घ्यावासा वाटत असेल तर तुम्ही सलाड खावू शकता. हलका आहारात सॅलड हा उत्तम पर्याय आहे. कोबी-टोमॅटोची कोशिंबीर हे खाण्यास चविष्ट तर आहेच पण आरोग्यदायीही आहे.
साहित्य
1 कप कोबी
१ कप टोमॅटो
१/२ कप कांदा
२ चमचे हिरवी धणे
१/४ टीस्पून काळी मिरी पावडर
चवीनुसार काळे मीठ
व्हेजिटेबल सॅलड कसे बनवायचे
प्रथम, कोबी किसून घ्या.
टोमॅटो आणि कांदे बारीक चिरून घ्या.
एका भांड्यात कोबी, टोमॅटो आणि कांदा एकत्र करा
काळी मिरी पावडर आणि कोथिंबीर घालून एकत्र करा.
कोबी-टोमॅटो सॅलड तयार आहे.
मीठ आणि मिरी पावडर टाकून सर्व्ह करा.
लिंबू आणि चाट मसालाही घालू शकता.