COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : सध्याच्या काळातील बदलत्या जीवनशैलीत बहुतेक लोक वाढत्या वजनाच्या किंवा पोटावरील वाढत्या चरबीच्या समस्येने त्रस्त आहेत. त्यामुले काही लोकं डाएटिंग सुरू करतात, तर काही थेट जेवणच कमी कमी करतात. डाएटिंग किंवा जेवण न करणे वजन कमी करण्यास उपयोगी ठरत नाही. वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सकस  अन्न खाणे आणि व्यायाम करणे होय.


उपमा आरोग्याने परिपूर्ण


सकाळची न्याहारी हे दिवसातील सर्वात महत्त्वाचे जेवण मानले जाते. कामाला उशीर होण्याच्या भीतीने किंवा डाएटिंगमुळे तुम्ही नाश्ता वगळल्यास, यामुळे तुम्हाला दिवसभर खूप अशक्तपणा आणि थकवा जाणवू शकतो. हलकं का असेना पण नक्की खायला हवं.


जर तुम्ही दररोज आरोग्यदायी ब्रेकफास्ट रेसिपी शोधून कंटाळला असाल, तर चव आणि आरोग्याच्या दृष्टीने उत्तम उपमा बनवा. ते बनवण्यासाठी तुम्हाला फक्त 20 मिनिटे लागतील. वाचा सोपी उपमा रेसिपी.


उपमा साठी साहित्य


2 कप रवा
1/2  टीस्पून मोहरी
1 कोरडी लाल मिरची
2 चमचे चना डाळ
10-12 कढीपत्ता
1/4 टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची
1/4 कप बारीक चिरलेले गाजर
1/4 कप फ्रेंच बीन्स
1 बारीक चिरलेला कांदा
1/4 कप कॉर्न कर्नल
लिंबाचा रस चवीनुसार मीठ
2 कप पाणी
2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर


उपमा कसा बनवायचा


1. कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी, कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या आणि चणा डाळचा तडका द्या.
2. नंतर त्यात कांदा हलका तपकिरी होईपर्यंत तळा. सर्व भाज्या एकत्र करा आणि मंद आचेवर 2 मिनिटे ढवळत राहा.
3. नंतर पाणी आणि मीठ घाला.
4. रवा घाला आणि सतत ढवळत राहा.
5. उपमा 2-3 मिनिटे होऊ द्या.
6. गॅस बंद करा आणि त्यात लिंबाचा रस घाला.
हिरव्या कोथिंबिरीने सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य समजुतींवर आधारित आहे. ते करण्यापूर्वी, वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)