मुंबई : मधुमेह हा झपाट्याने वाढणारा आजार आहे. भारताला तर मधुमेहाची राजधानी म्हटले जाते. बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवणारा या आजाराचा धोका नेमका कमी कसा करायचा हा प्रश्न अनेकांपुढे आ वासून उभा आहे. पण त्यावर एक दिलासा देणारे संशोधन समोर आले आहे. 


संशोधनातून सिद्ध


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉस एंजेलिसच्या कॅलिफोर्निया वर्ल्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार, रोज तीन अक्रोड खाल्याने टाईप-२ मधुमेहाचा धोका ४७% कमी होतो.


आहारातचं आहे आरोग्याचे गुपितं


हा शोध एका जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. यात अमेरिकेतील लोकांवर संशोधन करण्यात आले. १८-८५ वयोगटातील ३४, १२१ लोकांवर हा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगाच्या निष्कर्षानुसार, मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी आहाराचे पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे. आहारात अक्रोडचा समावेश केल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते. अक्रोडचे इतर अनेक फायदे....
म्हणजेच आहारातचं आरोग्याचे गुपितं आहे, हे स्पष्ट होते.