दररोज खा एक मूठ अक्रोड, होतील जबरदस्त फायदे

दररोजच्या आहारात अक्रोडचा समावेश केल्याने शरीरास अनेक फायदे होतात. 

Updated: Apr 13, 2018, 12:22 PM IST
दररोज खा एक मूठ अक्रोड, होतील जबरदस्त फायदे title=

मुंबई : दररोजच्या आहारात अक्रोडचा समावेश केल्याने शरीरास अनेक फायदे होतात. यामुळे अक्रोड खाण्याचा सल्ला दिला जातो. अक्रोडच्या दररोजच्या सेवनाने अनेक आजारांपासून संरक्षण होते आणि हृदयाचे आरोग्यही चांगले राहते. अक्रोड हा आपल्या मेंदूसाठी खूप लाभदायी असतो, म्हणून अक्रोड ला ब्रेन फूड म्हणतात. यामुळे आपल्या मेंदूची शक्ती वाढायला मदत मिळते. 

अक्रोडमध्ये असणाऱ्या रासायनिक गुणधर्मांनी रक्तप्रवाह उत्तम होतो. यामुळेच त्वचा तजलेदार होते. दररोज तीन ते चार अक्रोड खाल्ल्याने त्वचा चमकदार तसेच  सुंदर होते.

अक्रोडला एक एन्टी कॅन्सर फूड देखील म्हणतात. अक्रोडच्या सेवनाने  प्रोस्टेट व ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो. यामुळे वजन कमी होण्यासदेखील मदत होते. 

अक्रोड मध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळए भूक कमी होते तसेच अतिरिक्त वजन वाढत नाही. अक्रोडमधील फायबरमुळे आपले पोट निरोगी राहते तसेच पाचनशक्ती सुधारते. 

अक्रोड च्या सेवनाने आपला बुद्धी तल्लख होते. त्याच बरोबर मानसिक तणाव, ताण कमी होतो. अक्रोडमध्ये omega 3 fatty acid मुळे आपल्या शरीरात होणारी बेचैनी संपते. 

अक्रोड च्या सेवनाने आपण तणाव मुक्त होतो, तणाव मुक्त झाल्यामुळे आपल्याला चांगली झोप लागते. ज्यांना चांगली झोप लागते त्याचा मेंदू तल्लख होतो व शरीराला आराम मिळतो व मेंदूलाही आराम मिळतो, म्हणून रोज झोपण्याच्या आधी दुधासोबत अक्रोड खायला सुरवात करा. 

अक्रोडमधील fatty अॅसिड मुळे आपल्या शरीरातील कॅल्शियम वाढून आपल्या हाडांना पर्याप्त मात्रेत कॅल्शियम पुरवले जाते. ज्यामुळे आपली हाडे मजबूत होतात. कॅल्शियम आपल्या हाडांसाठी खूप फायदेशीर आहे.

अक्रोड ची साल काढून अक्रोड खाऊ नये कारण अक्रोडच्या सालीत ९० % अँन्टी ऑक्सिडेंट असतात. अक्रोड सालासकट खाल्यामुळे सालातील पौष्टिक तत्व आपल्या शरीराला मिळतात आणि हे पोष्टिक तत्व आपल्या त्वचेसाठी व केसांसाठी फायदेशीर असतात. 

अक्रोड मध्ये विटामिन्स, एन्टीऑक्सिडेट, मिनरल, प्रोटीन आणि SECL fatty अॅसिड असतात जे आपल्या त्वचेची देखभाल करतात.