Heart Attack and Stroke Risk News In Marathi: आजकाल रात्री उशीरा जेवणे ही एक फॅशन बनली आहे. पण हेच आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. कधीकधी काही कारणास्तव उशीर होणे ठीक आहे, परंतु आपण दररोज रात्रीचे उशीरा जेवण करणे टाळले पाहिजे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, रात्री 8 नंतर जेवण केले तर ते पचत नाही आणि त्यामुळे पोट फुगणे आणि वजन वाढणे अशा समस्या उद्भवतात. अशा स्थितीत जाणून घ्या रात्रीचे जेवण उशीरा केल्यानंतर कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागू शकत???


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकांना त्यांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे वेळेवर जेवण करणं शक्य होत नाही. परंतु ते किती धोकादायक असू शकते हे फार कमी लोकांना माहिती आहे. वेळेवर अन्न न खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे. या संशोधनातून असे दिसून आले की, दर तासाला 6 टक्क्यांनी वाढतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जगातील एक तृतीयांश लोकांच्या मृत्यूचे कारण म्हणजे आहार आहे. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज अभ्यासानुसार, 2019 मध्ये एकूण 1.86 कोटी लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी सुमारे 80 लाख लोकांचा मृत्यू केवळ आहारामुळे झाला. म्हणजेच वेळेवर अन्न न खाणे आणि संतुलित आहाराचा समावेश आपल्या दैनंदिन दिनचर्येत न केल्याने मोठे आजार होऊ शकतात.


उशिरा खाणे म्हणजे हृदयविकाराचा धोका


फ्रेंच संशोधन संस्थेच्या अभ्यासानुसार, दिवसाचे पहिले जेवण उशीराने केल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. म्हणजेच वेळेवर जेवणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत 1 तास उशीरा जेवणाऱ्या व्यक्तीच्या हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढत आहे.


या अभ्यासानुसार दिवसाचे पहिले जेवण (नाश्ता) सकाळी 8 वाजता केले पाहीजे. तर दुपारचे जेवण 12 ते 1 वाजेच्या दरम्यान करा. तर संध्याकाळी 5 वाजता नाश्ता करा. आणि रात्री ८ वाजेपर्यंत रात्रीचे जेवण करुन घ्यावे. प्रत्येक सलग दोन मीलमध्ये सरासरी वेळेत फरक आहे याची विशेष काळजी घेतली पाहिजे. असे केल्याने जास्त खाण्याची समस्या टळते. 


जेवणाच्या वेळा चुकल्यास शरीरावर काय परिणाम? 


- नाश्ता वेळेत नाही केला तर हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. 


- एक तास उशिरा जेवल्याने सेरेब्रोव्हस्कुलर आजारांचा धोका 6 टक्क्यांनी वाढतो.


- रात्री 9 नंतर जेवण केल्याने सेरेब्रोव्हस्कुलर आजाराचा धोका 28 टक्क्यांनी वाढतो.


- रात्री लवकर जेवल्याने या आजारांचा धोका 7 टक्क्यांनी कमी होतो.