काकडी खाल्ल्याने वाईट Cholesterol ची पातळी खरंच घटते? काय आहे सत्य!
भारतात, जेवणाची चव वाढवण्यासाठी, कोशिंबीरीचं सेवन केलं जातं. दरम्यान आपल्या कोशिंबीरीमध्ये निश्चितपणे काकडीचा समावेश केला जातो.
मुंबई : भारतात, जेवणाची चव वाढवण्यासाठी, कोशिंबीरीचं सेवन केलं जातं. दरम्यान आपल्या कोशिंबीरीमध्ये निश्चितपणे काकडीचा समावेश केला जातो. वजन लवकर कमी करण्यासाठी आणि शरीराला डिटॉक्स करण्यासाठी काकडी फायदेशीर मानली जातो. काकडीत पाण्याचं प्रमाण जास्त असते, त्याच्या सेवनाने शरीरातील पाण्याची पातळी कायम राहते. काकडीचेही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
दरम्यान आजकाल उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येमध्येही काकडीचं सेवन फायदेशीर मानले जाते. काकडी खाल्ल्याने शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते आणि रक्तदाबही नियंत्रित राहतो. काकडी खाल्ल्याने उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कशी संतुलित केली जाऊ शकते ते जाणून घेऊया.
काकडी विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते
नियमितपणे काकडीच्या सेवनाने शरीराला हानिकारक जंतू आणि विषारी पदार्थ बाहेर टाकणं सोपं होतं. परिणामी पाचन तंत्र निरोगी होतं. काकडी केवळ डिहायड्रेशन दूर करत नाही तर त्यात भरपूर फायबर देखील असतं, जे चांगल्या आतड्यांतील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रोत्साहन देऊ शकतं. काकडीमध्ये फायबर आणि पाण्याचं प्रमाणही चांगलं असतं आणि हे कमी कॅलरी असलेलं फळ आहे.
काकडीचे फायदे
मेडिकल न्यूज टुडेच्या मते, काकडीचं नियमित सेवन केल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल ऐवजी चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते, ज्यामुळे शरीराचे कार्य योग्य प्रकारे होण्यास मदत होते.
तेलकट अन्न आणि दुग्धजन्य पदार्थ शरीरात खराब कोलेस्ट्रॉल (LDL) निर्माण करतात. मात्र काकडीचं सेवन चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यास मदत करते.
शरीरातील लठ्ठपणा आणि रक्तातील साखरेचं प्रमाण वाढणं यांसारख्या अनेक आजारांसाठी उच्च कोलेस्ट्रॉल जबाबदार असतं. काकड्यांमध्ये कॅलरीज खूप कमी असतात, त्यामुळे त्या खाल्ल्याने वजन वाढत नाही आणि आहारही टिकून राहतो.
काकडीमध्ये स्टेरॉल घटक असतात, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL) 20 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात प्रभावी ठरतं.
काकडी कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासोबत फॅट बर्न करण्यास मदत करते. तसंच शरीरातील सर्व विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.
काकडीत 96% पर्यंत पाण्याचं प्रमाण असतं, जे तुम्हाला हायड्रेट ठेवू शकतं आणि तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतं. काकडीच्या सेवनाने पेशींना योग्य पोषण मिळतं. म्हणून, काकडी देखील एक चांगला स्नॅकिंग पर्याय आहे.