Health Benefits of Durva: पूजा विधीसाठी करताना दूर्वा वापरल्या जातात. विशेष म्हजणे गणपती बाप्पाच्या पूजेसाठी तर दूर्वाचे खास महत्त्व आहे. दूर्वां शिवाय बाप्पाची पूजा अपूर्ण मानली जाते. पण तुम्हाला हे माहीत आहे का? की गवतासारख्या दिसणाऱ्या या दूर्वांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे त्यांचे सेवन केल्यास अनेक लहान-मोठ्या आजारांपासून मुक्ती मिळते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दूर्वांची उंची साधारणपणे ६ ते ७ इंच असते. हे गवत अतिशय पातळ आणि जमिनीवर पसरून वाढते. या दूर्वांमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम, कार्बोहाइड्रेट आणि अ‍ॅंटी-व्हायरल, अ‍ॅंटी-माइक्रोबियल, अ‍ॅंटी-इंफ्लेमेटरी, जंतुनाशक गुणधर्म असतात. चला जाणून घेऊया कोणत्या आजारांवर औषध म्हणून दूर्वांचा वापर केला जाऊ शकतो.


 


हेही वाचा : यंदा लाडक्या बाप्पाला द्या हटके मोदकांचा नैवेद्य


 


या 15 आजारांवर दुर्वा फायदेशीर


नाकातून रक्त येणे
पचना संबंधीत समस्या
उच्च रक्तदाब
त्वचे संबंधीत समस्या
लठ्ठपणा
अशक्तपणा
किडनी स्टोन
डोळ्यांच्या समस्या
मानसिक आरोग्य
मलेरिया
मूळव्याध
अपस्मार (फिट येणे)
लैंगिक समस्या
तोंड येणे
यूरीन इंफेक्शन


असे करा दुर्वांचे सेवन


सकाळी रिकाम्या पोटी दुर्वांचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. तुम्ही दुर्वा वाळवून त्याची पावडर करून ठेऊ शकता आणि दररोज एक चमचा दुधासोबत त्याचे सेवन करू शकता. किंवा दुर्वांचा रस काढून तुम्ही पिऊ शकता.


हे लक्षात ठेवा


दुर्वांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने त्वचेची आग होणे, खाज सुटणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून दुर्वां खाण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या.