Monkeypox: मांसाहार केल्याने होतो मंकीपॉक्स? Virus बाबत हे जाणून घेणं महत्त्वाचं!
जगात कोरोनाच्या महामारीनंतर आता `मंकीपॉक्स`च्या संसर्गाने डोकं वर काढलं आहे.
मुंबई : जगात कोरोनाच्या महामारीनंतर आता 'मंकीपॉक्स'च्या संसर्गाने डोकं वर काढलं आहे. हा संसर्ग पसरत असून हा आता चिंतेचा विषय बनलाय. आतापर्यंत किमान 19 देशांमध्ये मंकीपॉक्सच्या प्रकरणांची नोंद झाली आहे. दरम्यान यानंतर आता मंकीपॉक्सबाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज पसरू लागलेत. मात्र लोकांनी अफवांवर लक्ष देऊ नये, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
आज आम्ही तुम्हाला मंकीपॉक्सबद्दल पसरलेल्या गैसमजांविषयी सांगणार आहोत.
मंकीपॉक्स केवळ माकडांमार्फत पसरतो
या संसर्गाचा नाव मंकीपॉक्स आहे पण याचा अर्थ हा व्हायरस केवळ फक्त माकडांपासून पसरतो असं नाही. मंकीपॉक्स संक्रमित व्यक्ती किंवा प्राण्याशी जवळच्या संपर्कातून व्यक्तींमध्ये पसरतो. कोणत्याही प्राण्याला याची लागण होऊ शकते.
मांस खाल्ल्याने मंकीपॉक्सची लागण होते
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, केवळ मांस खाल्ल्याने मंकीपॉक्सची लागण होत नाही. सोशल मीडियावर मंकीपॉक्सबाबत अनेक पोस्ट केल्या गेल्यात. मात्र तज्ज्ञांनी याला एक गैरसमज म्हटलं आहे. हा व्हायरस संक्रमित प्राण्यांच्या सेवनाने पसरू शकतो. परंतु निरोगी, चांगलं शिजवलेलं मांस खाण्याने व्हायरस पसरत नाही.
मंकीपॉक्स कोरोनापेक्षा अधिक संक्रामक
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र असं मानलं जाऊ शकत नाही की, मंकीपॉक्स कोरोनापेक्षा अधिक संसर्गजन्य आहे. नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन कोविड वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ एन के अरोरा यांनी सांगितलं की, 'मंकीपॉक्स हा कोविडसारखा संसर्गजन्य किंवा गंभीर नाही. मात्र, त्याचा प्रसार हा चिंतेचा विषय आहे. भारतात आतापर्यंत एकही संशयित प्रकरण समोर आलेलं नाही.