गरोदरपणात `या` पदार्थामुळे वाढतो मधुमेहाचा धोका
गरोदरपणाच्या काळात स्त्री शरीरामध्ये अनेक बदल होतात.
मुंबई : गरोदरपणाच्या काळात स्त्री शरीरामध्ये अनेक बदल होतात. महिलेच्या शरीरामध्ये दिवसागणिक होणार्या बदलांवर बाळाचं आरोग्य अवलंबून असते. यादरम्यान गरोदर स्त्रीला बाळासोबतच स्वतःच्या आरोग्याचीदेखील काळजी घेणं गरजेचे आहे.
प्रामुख्याने गरोदर स्त्रियांना त्यांच्या आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे. बाळाचं आणि आईचं आरोग्य तिच्या खानपानावर अवलंबून असते किंवा या दिवसात दोघांच्या आरोग्याची काळजी घेताना अधिक खाण्याच्या सवयीमुळे मधूमेहाचा धोका बळावतो. गरोदरपणातील मधूमेहाचा त्रास पुढेही धोकादायक ठरतो. सिझेरियन प्रसुतीबाबतची 8 धक्कादायक सत्य !
गरोदरपणात मधूमेहाचा धोका
अमेरिकन नॅशनल इंस्टिट्युट ऑफ हेल्थ आणि हॉवर्ड युनिव्हरसिटी संशोधनाच्या दाव्यानुसार, गरोदरपणात बटाट्याच्या सेवनामुळे महिलांमध्ये मधूमेह जडण्याचा धोका बळावतो. बटाट्याऐवजी इतर भाज्यांचा आहारात अधिक समावेश करावा.
गरोदरपणाच्या काळात रक्तामध्ये साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. परिणामी यामधून मधूमेहाचा धोका बळावतो.
कशामुळे होतो मधुमेह होतो ?
शरीरात इन्सुलिन नामक हार्मोन्सचा प्रवाह होत असतो. या हार्मोनसच्या कार्यात बिघाड झाल्यास शरीरात मधुमेह जडतो. गरोदरपणाच्या काळात जडणार्या मधुमेहाला जेस्टेशनल डायबिटिज म्हणतात. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्यातून टाईप 2 मधुमेह जडण्याची शक्यता असते. या '१०' लक्षणांवरुन जाणा मधुमेह आहे की नाही?