मुंबई: तुम्ही अगदी लहानपणापासून कोंबड्या पाहात आला असाल. अगदी काळया, पांढऱ्या, राखडी, तांबड्या, खैऱ्या वैगेरे वैगेरे. पण, कोंबडा किंवा कोंबडी कोणत्याही रंगाची असेना का. पण, तिची अंडी ही पांढऱ्याच रंगाची असतात. फार फार तर देशी कोंबडीची अंडी फिक्कट तपकीर रंगाची असू शकतात. पण, तुम्ही चक्क रंगाने पूर्णपणे काळी असणाऱ्या आणि काळीच अंडी देणाऱ्या कोंबडीबाबत ऐकले आहे का? बहुतेकांनी नसेलच. म्हणूनच आम्ही सांगत आहोत त्या कोंबडीबद्दल. जी देते काळी अंडी आणि अनेकांना करू शकते मालामाल.


प्रतिनग ७० रूपयांना विकले जाते अंडे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होय, आम्ही सांगोतय उत्तर प्रदेशातील कोंबडीबाबत. जी रंगाने काळी आहे आणि तिच्या अंड्यांचा रंगही असतो काळाच. या कोंबडीचे नाव तर तुम्ही ऐकले असेलच. या कोंबडीचे नाव आहे कडकनाथ. कोंबड्यांच्या अतिशय दुर्मिळ असलेल्या प्रजतींपैकी ही एक प्रजात आहे. कडकनाथ कोंबड्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असली तरी, प्रजात मात्र दुर्मिळच आहे. कडकनाथची कोंबडा असो की, कोंबडी दोन्ही महागच असतात. कडकनाथ कोंबडीची अंडीही अतिशय महाग असतात. प्राप्त माहितीनुसार, कडकनाथ कोंबडीचे एक अंडे सुमारे ७० रूपयांना विकले जाते. आता तुम्हीच विचार करा. अंडे इतके महाग तर, कोंबडा आणि कोंबडी किती महाग असेल?


चिकन ९०० ते १००० रूपये किलो


कडकनाथ कोंबडा, कोंबडी ही प्रामुख्याने मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात पाळली जाते. विशेष असे की, कडकनाथ कोंबडीचे चिकन सुमारे ९०० ते १००० रूपये किलोने बाजारात मिळते. कडकनाथचे चिकन आरोग्याला फायदेशीर असल्याचा दावा केला जातो. कडकनाथच्या मांसात प्रोटीनची मात्रा मोठ्या प्रमाणावर असते. तसेच, त्यात व्हिटॅमीन बी-१, बी-२, बी-६, बी-१२, सी आणि इसुद्धा असते. ही सर्वच व्हिटॅमीन आरोग्यासाठी महत्त्वाची असतात. 


तरूणांना खास संधी


अनेक तरूणांनासाठी कडकनाथ कोंबडी आर्थिक उन्नतीसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण, कडकनाथ कोंबडी आणि तिच्या अंड्याची बाजारात वाढत असलेली मागणी विचारात घेता हा एक प्रमुख व्यवसाय ठरू शकतो. तुम्ही बाजारपेठेचा विचार करून कडकनाथ कोंबडी पालनाचा विचार कराल तर, अल्पावधीत मालामाल होऊ शकता.