मुंबई : एक्झिमा हा एक त्वचाविकार आहे. या आजारामध्ये त्वचेवर खाज येणं, लाल चट्टे येणं हा त्रास होतो. वाढतं प्रदुषण, धूळ किंवा खाद्य पदार्थांची अ‍ॅलर्जी यामुळे काहींना एक्झिमाचा त्रास होतो. हा त्रास तुम्हांला आटोक्यात ठेवायचा असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. सोबतच आहाराचं काही पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे. म्हणूनच एक्झिमाचा त्रास होत असल्यास हे पदार्थ खाणं टाळा. 


एक्झिमाच्या रूग्णांनी काय खाणं टाळाल ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. एक्झिमाचा त्रास असणार्‍यांनी आहारात ग्लुटनयुक्त पदार्थांचा समावेश टाळावा. प्रामुख्याने गहू, नाचणीऐवजी बाजरीचा आहारात समावेश करावा.  


2.एक्झिमाच्या रूग्णांना दुग्धजन्य पदार्थांचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे पाश्चराईज्ड दूध, पनीर यांचा आहारातील समावेश टाळावा. या पदार्थांमधील केसीन प्रोटीन एक्झिमाचा त्रास बळावण्यास कारणीभूत ठरू शकतो. 


3.काही तज्ञांच्या मते, एक्झिमाचा त्रास असणार्‍यांमध्ये सोया प्रोडक्ट्सचं सेवनही त्रासदायक ठरू शकतं. यामध्ये सोया मिल्क, टोफू, सोया नगेट्स यापासूनही दूर राहणं गरजेचे आहे. या पदार्थांमुळे रिअ‍ॅक्शन होण्याचा धोका अधिक असतो. 


4. फळांच्या सेवनाबाबतही एक्झिमाच्या रूग्णांनी दक्ष असणं गरजेचे आहे. या आजारामध्ये आंबट फळांचं सेवन टाळावे. अननस, लिंबू, टॉमॅटोयामुळे त्रास अधिकच बळावण्याची शक्यता असते.