मुंबई : मुलींना ठराविक दिवसांनी चेहर्‍यावरील केस काढण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये थ्रेडिंग किंवा वॅक्सिंगचा पर्याय निवडावा लागतो. हे पर्याय वेदनादायी असले तरीही चेहर्‍यावरील अनावश्यक केसांमुळे अनेकदा मुलींचा आत्मविश्वास ढासळतो. त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो. मग आता तुम्हांला चेहर्‍यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी ब्युटी ट्रीटमेंटची गरज नाही ... कारण काही घरगुती उपायदेखील चेहर्‍यावरील अनावश्यक केस काढण्यास मदत करतात हे तुम्हांला ठाऊक आहे का ? 


चेहर्‍यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी खास फेसपॅक - 


फेसपॅकसाठी आवश्यक साहित्य - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्धा टीस्पून कॉर्नफ्लॉवर


एका अंड्यातील पांढरा भाग  


एक टीस्पून साखर  


कसा वापराल हा फेसपॅक  


तिन्ही साहित्य एका भांड्यात मिसळा. अंड्याच्या पांढर्‍या भागात साखर आणि कॉर्नफ्लॉवर नीट फेसा. मिश्रण फेटल्यानंतर फेसपॅक तयार होईल. हा फेसपॅक चेहर्‍यावर अनावश्यक केस काढायचे असतील तेथे लावा. हा पॅक सुकल्यास पुरेसा वेळ द्या. त्यानंतर पिल ऑफप्रमाणे हा फेसपॅक काढा. 


केसांच्या दाटपणावर त्याचं खेचून बाहेर येणं अवलंबून असते त्यामुळे तुमच्या केसांची वाढ पाहून हा फेसपॅक निवडा. काही महिने नियमित हा फेसपॅक लावल्याने केसांची वाढ हळूहळू कमी होण्यास मदत होते.