मुंबई : अॅसिडीटी, छातीतील जळजळ याचा अनुभव आपण सर्वांनीच घेतला आहे. याची अनेक कारणे आहेत. धावपळीची जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या वेळा, अनहेल्दी फूड, अपूर्ण झोप अशा अनेक कारणांमुळे अॅसिडीटी आणि अपचन होते. त्यामुळेच पित्त, अपचन, अॅसिडीटी अशा समस्या अनेकांमध्ये सर्रास आढळतात. पण यावर वारंवार औषधे घेणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतील. पण हे घरगुती उपाय अतिशय परिणामकारक आहेत. पण हे उपाय खरचं परिणामकारक आहेत का ? असा प्रश्न तुमच्या मनात रेंगाळतोय? पण काळजी करु नका अॅसिडीटी, अपचन, हार्टबर्न यापासून सुटका मिळवण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करुन पहा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


आवळा


शरीराला थंडावा देणारे आणि अॅसिडीटीपासून बचाव करणारे गुणधर्म आवळ्यात असतात. आवळ्यात व्हिटॉमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने पोटदुखीवर परिणामकारक ठरतात. प्रत्येक दिवशी एक चमचा आवळा पावडर घेतल्यास अॅसिडीटीपासून मुक्तता लाभेल.


केळ


केळे पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. केळ्यात फायबर्स अधिक प्रमाणात असतात. अन्नपचनासाठी त्याचा फायदा होतो. केळ्यात पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असल्याने पोटात अॅसिड तयार होत नाही.


थंड दूध


दूधात कॅल्शियम असते. त्यामुळे शरीरातील पीएच बॅलन्स संतुलित राहते आणि अन्नपचानासही मदत होते. थंड दुधामुळे पोटातील जळजळीवर ताबडतोब आराम मिळतो. मात्र त्यासाठी साखर न घालता थंड दूध प्या.


ताक


अॅसिडीटी आणि छातीतील जळजळीवर ताकामुळे आराम मिळतो. ताकात लॅक्टिक अॅसिड असते. त्यामुळे पोटातील अॅसिडीटी क्षमण्यास मदत होते.


बडीशेप


बेडीशेपमध्ये एंथॉल कंपाऊंड असते. त्यामुळे पोटाला थंडावा मिळतो. यात व्हिटॉमिन, मिनरल्स आणि फायबर्स असतात जे पचनास मदत करतात. तसंच त्यात अॅंटीफंगल गुण असतात ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.


तुळस


तुळशीच्या पानांमुळे छातीतील जळजळ आणि अॅसिडीटी नियंत्रित राहते. २-३ तुळशीची पाने खाल्याने पोटातील अॅसिडीटी कमी होते. तुळशीच्या पानात अॅंटी अल्सर गुणधर्म असतात त्यामुळे गॅस्ट्रीक अॅसिडची निर्मिती कमी होते.


पुदीन्याची पाने


पुदीन्यात नैसर्गिक कूलिंग एजेंट असतात. पोटातील अॅसिड कमी करुन पचनतंत्र मजबूत करण्यासाठी पुदीना उपयुक्त ठरतो. त्यासाठी पुदीन्याची पाने पाण्यात उकळवून ते पाणी प्या.