मुंबई : अनेकदा महिला त्यांचा योग्य साथीदार, करियरचा तोल सांभाळत पुढे जाताना लग्नाचा आणि बाळाचा विचार करताना वय मात्र पुढे जाते. महिलांमध्ये वयाची पस्तीशी ओलांडल्यानंतर आई होण्याची क्षमता कमी होते. मात्र विज्ञान आणि आरोग्यक्षेत्रामध्ये विकसित तंत्रज्ञानाच्या जोडीने 35 -40 वयातील महिलादेखील यशस्वीरित्या आई होऊ शकता. 


एग फ्रिजिंगमुळे नव्या आशा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एग फ्रीजिंग एसिस्टेड रिप्रोडक्टिव टेक्नालॉजी (एआरटी) मुळे स्त्रियांना नवी आशा मिळाली आहे. जेव्हा एका मुलीचा जन्म होतो तेव्हापासूनच तिच्या अंडाशयामध्ये अंडी असतात. सुरूवातीला ही अंडी निष्क्रिय असतात. सेक्सदरम्यान हार्मोनल बदल झाल्यानंतर त्यांना चालना मिळते. 


काही महिलांमध्ये नैसर्गिकरित्या अंड्याची निर्मिती होण्याचं प्रमाण कमी असते. अशावेळेस अंड्यांची निर्मिती वाढवण्यासाठी आठवडाभर किंवा त्याहूँ जास्त काळ फर्टिलिटी ड्रग दिली जातात. अंड्यांची निर्मिती झाल्यानंतर अल्ट्रासाऊंड स्कॅनद्वारा लक्ष ठेवले जाते. त्यानंतर एनेस्थेशिया देऊन अंडी शस्त्रक्रियेच्या मदतीने बाहेर काढली जातात. ही अंडी 196 डिग्रीमध्ये नायट्रोजनमध्ये फ्रीज केली जातात. अशाप्रकारे वर्षानुवर्ष अंडी सुरक्षितपणे साठवली जाऊ शकतात. 


वयाच्या कोणत्या टप्प्यावर अंडी फ्रीज करणं सुरक्षित ? 


अनेक महिलांना असे वाटतं की अंडी कधीही फ्रीज केली जाऊ शकतात. अनेक  महिला वयाच्या 40शी पर्यंत थांबतात. मात्र अनेकदा त्याला उशीर झालेला असतो. महिला 25-37च्या वयोगटात असतात तेव्हा एग फ्रीज करणं उत्तम आहे. या वयात अंड्यांची गुणवत्त उत्तम असते.  


कोणत्या महिलांसाठी अधिक फायदेशीर ? 


- ज्या महिला आई होण्याचा निर्णय दुय्यमस्थानी ठेवून त्यापूर्वी दुसरे एखादे लक्ष्य पूर्ण करण्याचा पाठलाग करत आहेत. 


- योग्य साथीदारासाठी, लग्नासाठी वेळ घेणार्‍यांसाठी 


- तरूण वयात मुलींना कॅन्सरचे निदान झाल्यास एग फ्रिजिंग करावे. केमोथेरपी, रेडिओथेरपीमुळे अंड्यांचं नुकसान होऊ शकतं


- घरामध्ये अर्ली मेनोपॉजचा इतिहास असल्यास