National Egg Day 2024 : अंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं की नाही? त्यातील बलक खावं की नाही?
Eggs and Cholesterol : आज राष्ट्रीय अंडी दिन (National Egg Day 2024) आहे. त्यानिमित्ताने अंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं की नाही? यासोबत अंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या.
Eggs and Cholesterol : संडे हो या मंडे रोज खाओ अंडे हे वाक्य आपण लहानपणापासून जाहिरातीमधून पाहत आलो आहेत. रोज अंडी खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. आपल्यापैकी अनेकांना अंडी खायला खूप आवडतात. नाश्त्यात उकडलेले अंडे खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. त्यात आज राष्ट्रीय अंडी दिन (National Egg Day 2024) निमित्त जाणून घेणार आहोत की, रोज अंडी खाल्ल्यामुळे आपल्या रक्तातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढते का? आज ही शंका दूर करणार आहोत.
अंडी खाल्ल्यामुळे खरंच कोलेस्ट्रॉल वाढवतात का?
अनेक संशोधनातून असं सिद्ध झालंय की अंड्यांमध्ये चांगले कोलेस्ट्रॉल असतं. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. अशा प्रकारचे कोलेस्टेरॉल आपल्या शरीरात निरोगी पेशी तयार करण्यास मदत करतात. त्यात सॅच्युरेटेड किंवा ट्रान्स फॅट नसल्यामुळे ते एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढवत नाही, हे आहारतज्ज्ञ सांगतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त उकळूनच अंड्याच सेवन करा. जास्त तेल किंवा बटरमध्ये शिजवल्यास फायदा ऐवजी तुमचं नुकसान होतं.
किती अंडे खावेत?
अंडी खाल्ल्याने चांगले कोलेस्ट्रॉल वाढतं, जे उच्च रक्तदाब आणि हृदयविकारापासून आपले संरक्षण करण्यास मदत करतं. आहारतज्ज्ञ आयुषी यादव सांगतात की, जर तुम्ही दिवसातून दोन अंडी खाल्ले तर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यापेक्षा जास्त सेवन करायचे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या असा सल्ला ते देतात. जे लोक हेवी वर्कआउट करतात त्यांनी जास्त अंडी खाण्यास हरकत नाही.
अंडी खाण्याचे फायदे कोणते ?
प्रोटिन्सचा उत्तम स्त्रोत
अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्वांचा समावेश असून त्यात प्रथिनांचा प्रमुख स्त्रोत म्हणून अंड्यांचा आहारात समावेश करण्यास आहार तज्ज्ञ सांगतात. अंड्यामध्ये प्रथिनांचे मुबलक प्रमाण असल्यामुळे शरीरातील पेशींची दुरूस्ती आणि नवीन पेशी निर्माण मदत मिळतो.
मांसपेशींसाठी लाभदायी
अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये प्रथिने आणि अमिनो अॅसिड्स मुबलक प्रमाणात आढळते. हे पोषक घटक आपल्या शरीरातील मांसपेशी वाढण्यास मदत आणि स्नायू मजबूत राहतं.
डोळ्यांसाठी फायदेशीर
अंड्यामध्ये आढळून येणाऱ्या पोषकघटकांमुळे अंडी उकडून खाल्ल्याने आपल्या डोळ्यांनाही फायदा मिळतो.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)