मुंबई : आज कॅबिनेटच्या बैठकीत काही लोकहिताचे महत्वाचे निर्णय घेण्यात आले. आजच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत कोरोनासंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील 18 ते 59 वयोगटातील व्यक्तींना मोफत बूस्टर डोस देणार असल्याचं म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सकाळी पंतप्रधानांनी फोन करून सुचना दिल्या की, राज्यात 18 ते 59 वयोगटातील सर्वांना बूस्टर डोस मोफत देण्याचं जाहीर केलंय. मात्र त्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर राज्यात देखील व्हायला हवी. यासाठी खास मोहीम देखील राबवण्यात येणार आहे. ज्यामुळे सर्वांनाच याचा फायदा होईल.


दरम्यान कोरोनाची परिस्थिती पाहता खबरदारी म्हणून मोदी सरकारने कोरोना लसीचा बूस्टर डोस मोफत केल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. 15 जुलैपासून देशातील 18 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस दिला जाणार आहे. पुढील 75 दिवस बूस्टर डोसची मोहिम राबवली जाणार आहे. सध्या देशभरात 199 कोटी नागरिकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.


देशभरात आतापर्यंत 18 ते 59 वर्षे वयोगटातील 77 कोटी नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी बूस्टर डोस मोफत करण्याची मोदी सरकारने घोषणा केली आहे.