रूग्णांना तासभरात उपचार मिळण्यासाठी `इमर्जन्सी रुम`ची सुविधा
वोक्हार्ट रूग्णालयात रूग्णांसाठी `इमरर्जन्सी रूम`ची सुविधा
मुंबई : अपघात झाल्यापासून एक तासाच्या अगोदर संबंधित रूग्णाला उपचार मिळाल्यास सदर रूग्ण बचावण्याची शक्यता राहते. त्यामुळे या कालावधीला वैद्यकीय क्षेत्रात ‘गोल्डन अवर’ असे संबोधले जाते. दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत रूग्णाला तातडीने रूग्णालयात पोहोचवून त्याच्यावर उपचार सुरू होणे फार गरजेचे असते. वेळीच उपचार मिळाल्यास रूग्णाचा जीव वाचवणं शक्य होते. इतकंच नाहीतर गोल्डन अवरमध्ये रूग्णाचा जीव वाचवण्यासाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. या अनुषंगाने मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयात रूग्णांसाठी 'इमरर्जन्सी रूम'ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सध्याच्या स्थितीत संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी प्रतिबंधात्मकउपाययोजना आणि विविध कार्यक्रम राबवले जात आहे. परंतु, तरीही अनेकदा संसर्गजन्य आजारांवर मात करणे शक्य होताना दिसून येत नाहीये. वाढती लोकसंख्या, असुरक्षित वयोगटातील लोक, आरोग्य सुविधांचा अभाव यामुळे अनेक विविध आजार जीवावर बेतू लागले आहेत. ही स्थिती लक्षात घेऊन रूग्णांना आपत्कालीन परिस्थितीत योग्य ते उपचार मिळावेत यासाठी प्राथमिक प्रतिबंधात्मक धोरण लागू करणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे, इमर्जन्सी मेडीसीन आता जगभरात एक प्रमुख वैशिष्ट्य ठरत आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर रूग्णांना तातडीने औषधोपचार मिळावेत, यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. आतापर्य़ंतमे 2019 पासून साधारणतः 82 देशांमध्ये इमर्जन्सीमेडिसिन या सुविधेला मान्यता देण्यात आली आहे. यात प्रामुख्यानेआफ्रिकेतील १ देश, आशियातील २ दोन, अमेरिकेतील १ देश, युरोपमधील २ दोन आणि ओशनियामधील दोन देशांमध्ये रूग्णांसाठी इमर्जन्सी मेडीसीन ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे, सध्याची स्थितीत विविध आजारांच्या रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता भविष्यात आपत्कालीनवैदयकीय औषधांची गरज मोठ्याप्रमाण भासू शकते.
जगभरातहोणाऱ्या एकूण मृत्यूंच्या तुलनेत भारतात होणाऱ्यासर्वांधिकमृत्यूंचे कारण हृदयविकार आहे. सध्या भारतात मायकोकार्डियलइन्फेक्शनचा धोका सर्वात जास्त आहे. याशिवाय रस्ते अपघातात मृत्यूमुखीपडणाऱ्यांची संख्याही भारतात दिवसेंदिवस वाढतेय.
2017 च्या आकडेवारीनुसार, देशात झालेल्या रस्ते अपघातात दर तासाला 16 लोकांचा मृत्यू झाला असून 53 लोक गंभीर जखमी झाले होते. या रस्ते अपघातांच्या संख्येत आता 32 टक्क्यांनी वाढ होऊ लागली आहे. दुर्देवाची बाब म्हणजे, मृत्यूमुखीपडणाऱ्या या व्यक्ती 25 ते 30 वयोगटातील असून कुटुंबात एकमात्र कमावती व्यक्ती आहेत. 2015 च्या आकडेवारीनुसार देशभरात 1.46 लोकांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला आहे. वैद्यकीय मदत तात्काळ न मिळणे हे या मृत्यूंमागीलप्रमख कारण आहे. हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांना तातडीने उपचार मिळणं गरजेचं आहे. जेणेकरून वेळीच उपचार झाल्यास डॉक्टरांना जीव वाचवणं शक्य होतं. कारण, अनेक अपघातामुळे रूग्णाला संसर्गाचा धोका अधिकपट असतो. संसर्ग होण्यापासून बचाव व्हावी, यासाठी तातडीने वैद्यकीय सुविधा मिळणं गरजेचं आहे.
महत्त्वाचं म्हणजे, हृदयरोग, स्ट्रोकचा झटका येणं, दमा, फुफ्फुसाचा आजार आणि गर्भवतीला प्रसूती काळा सुरू झाल्यास अशा रूग्णांना तातडीने वैद्यकीय सुविधा मिळाल्या पाहिजेत. या रूग्णांना रूग्णालयात नेण्यास विलंब लागल्यास आणि वेळीच उपचार न मिळाल्यास रूग्ण दगावू शकतो. 30 ते 69 वयोगटातील व्यक्तींमध्ये मृत्यूचं प्रमाण 57 टक्के इतकं आहे. याशिवाय मलेरिया, डेंग्यू, हिवताप, क्षयरोग यांच्यासारख्या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण ठेवणं फारच अवघड आहे. त्यामुळे या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवणं आवश्यक आहे.
इंडियन स्टोक असोसिएशनच्या माहितीनुसार, भारतात पक्षाघात (स्ट्रोक) चा विकार असणाऱ्यारूग्णांची संख्या वाढतेय. सध्या देशभरात 1.5 मिनियन लोक या पक्षाघाताच्या आजाराने त्रस्त आहेत. राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्ट्रोकचा आजार होणाऱ्या रूग्णांची संख्या जास्त आहे. ग्रामीण भागात एक लाख लोकसंख्यामागे 194-215 लोक या आजाराने ग्रासलेले आहेत. तर शहरात एक लाख लोकसंख्येच्या तुलनेत हा आकडा 119-145 रूग्ण इतका आहे. दरम्यान, विकसित देशांमध्ये या आजाराच्या रूग्णांच्या संख्येत 42 टक्क्यांनी घट झाली आहे.
केवळ मुंबईत आणि महाराष्ट्रातच नव्हेतर भारतातील प्रत्येक भागात कुठे रस्ते अपघात घडतायेत तर कुठे आपत्कालीन परिस्थिती पाहायला मिळतेय. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे असंसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असताना आता संसर्गजन्य आजारही समाजात पाय रोवू लागले आहेत. या सर्व गोष्टींचा सामना वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस आणि अन्य कर्मचाऱ्यांना करावा लागतोय. परंतु, डॉक्टरांवर अवलंबून न राहतात हे आजार कसे टाळता येतील यासाठी प्रत्येकानेच आपआपल्यापरिने प्रयत्न करणे गरजेचं आहे. तरच या आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका टाळता येऊ शकतो.
आपत्कालीन स्थिती रूग्णांनायोग्यपद्धतीने वैद्यकीय सुविधा मिळावी, यासाठी मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयात स्वतंत्र खोलीची सोय उपलब्ध करून दिली आहे.
यात रूग्णाच्यासुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. इमरर्जन्सीरूमप्रोटोकॉलचा वापर करूनच ही खोली तयार करण्यात आली आहे. या आपत्कालीन कक्षात निदान चाचणी करण्याची सोय आहे. प्रोटोकोलचा वापर करून वेदनांचे लवकर उपचार केले जात आहेत. याशिवाय स्ट्रोक आणि शॉक पोस्ट ट्रॉमाच्यारूग्णांमध्ये रक्त संक्रमण यांसारख्या थ्रोम्बोलायटिकथेरपीची सुविधा देण्यात आली आहे. इतकंच नाहीतरट्रॉमाकेअरमध्ये उपचार सुरू असणाऱ्यारूग्णांना निदान आणि शस्त्रक्रियेची सुविधा आता लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच गंभीर रूग्ण जसे, हृदयविकाराची तीव्र झटका आलेल्यांसाठी हिरवा रंगाचा कोड अशाप्रकारेआपत्कालीन स्वतंत्र कक्षाच्या माध्यमातून एक तासाच्या आत गंभीर रूग्णांवर उपचार करणे हे रूग्णालयातील डॉक्टरांसमोर मोठे आव्हानच आहे.
आपत्कालीन स्वतंत्र कक्ष
हवा खेळती राहिल इतकी मोठी खोली आहे.
या खोलीला दोन्ही बाजूला उघडा दरवाजा आहे.
24 तास हा दरवाजा खुला असतो
सर्व प्रकारच्या आपत्कालीन रूग्णांसाठी या ठिकाणी सोय करण्यात आली आहे.
एक तृतीयांशरूग्णांना या खोलीत दाखल करून उपचार दिले जातील