मुंबई : उन्हाळा येताच कडकडीत उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपण सगळे योग्य सनस्क्रीमच्या शोधात असतो. परंतु, स्किन केयर किंवा ब्युटी प्रॉडक्स विकत घेण्यापूर्वी हे सल्ले जाणून घ्या.


मॉइश्चरायझर:


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वसाधारणपणे असा गैरसमज आहे की उन्हाळ्यात मॉइश्चरायझर वापरण्याची आवश्यकता नाही. परंतु, कोरडेपणा टाळण्यासाठी झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे. त्वचेची योग्य काळजी घेतली जावी यासाठी लोशन बेस्ड मॉइश्चरायझर लावा.


साबण:


घामाची दुर्गंधी आणि त्यामुळे येणारी खाज यापासून सुटका मिळवण्यासाठी मेडिकेटेड साबणाऐवजी नेहमीचा साबण वापरा. कारण त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अॅलर्जीला आळा बसेल व त्वचेला खाज येणे, कोरडी पडणे यांसारख्या समस्यांचा धोका कमी होईल.


कॅलमाईन लोशन:


ज्यांना खूप घाम येतो त्यांना आणि विशेषतः लहान मुलांना उन्हामुळे रॅशेस येण्याचा धोका अधिक असतो. यासाठी कॅलमाईन लोशन अत्यंत उपयुक्त ठरते आणि रॅशेस पासून आराम मिळतो.


सनस्क्रीम:


गेल्या वर्षी आणलेले सनस्क्रीम यंदा वापरू नका. कारण त्याचा यूव्ही कमी झाला असण्याची शक्यता आहे. नवीन सनस्क्रीम विकत घ्या आणि बाहेर पडण्यापूर्वी अर्धा तास आधी लावा. तसंच तुम्ही उन्हात बाहेर फिरत असाल तर एक-दोन तासांनंतर सतत लावत रहा.