मुंबई : थंडीची चाहुल लागली की आजारपण बळावायला सुरूवात होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिवाळ्याच्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये सर्दी, खोकला, नाक चोंदणं, घसा खवखवणं अशा समस्या हमखास उद्भवतात. मग त्यावर अ‍ॅन्टीबायोटिक्स औषधं घेण्याऐवजी तेलांचे काही पर्याय फायदेशीर ठरू शकतात. 


लेमन इसेन्शिएअल ऑईल -


अरोमाथेरपीसाठी सायट्र्स इसेंशिएल ऑईल फायदेशीर टह्रते. यामधील गुणधर्म सर्दी, खोकला अशा लहान सहान समस्यांवर प्रभावी औषध म्हणूनदेखील फायदेशीर ठरतं. त्याचा रिफ्रेशिंग सुवास थकवा दूर करण्यास फायदेशीर ठरतो. छातीवर या तेलाचा हलका मसाज करा.  


पेपरमिंट ऑईल - 


पेपरमिंट तेलामध्ये मेन्थॉलच कॉन्सनट्रेशन असते. फ्लु, सर्दी आणि कंजेशन असल्यास पेपरमिंट तेल फायदेशीर ठरते.  छातीवर या तेलाचा हलका मसाज करा.


टी ट्री ऑईल -


सर्दीमुळे खोकला किंवा छाती भरून आल्यास टी ट्री ऑईल फायदेशीर ठरते. या तेलाचा मसाज करा किंवा पाण्यामध्ये मिसळून त्याची वाफ घ्या. 


निलगिरीचे तेल -  


कफाचा त्रास किंवा छाती भरून आल्यास निलगिरीचे तेल फायदेशीर  ठरते. निलगिरीच्या तेलाचा मसाज छाती, नाक मोकळी करण्यास मदत करते.