मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसांत लिंबू सरबताला मोठी मागणी येते. शिवाय अनेकजण सकाळी लिंबू पाण्यात मध घालून त्याचं सेवन करतात. हे पेय तुमच्या शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतं. मात्र तुम्हाला कल्पना आहे का की, तुम्हाला आवडत असलेलं हे लिंबू सरबत तुमच्या दातांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, आम्ल द्रव पदार्थ जसं की लिंबू सरबत तुमच्या दाताच्या इनॅमलला (बाहेरील स्तर) नष्ट करू शकतं. दांतावर इनॅमल नष्ट झाल्यानंतर दात पिवळे पडण्याची शक्यता अधिक असते. 


लिंबू पाणी पिताना कोणती काळजी घ्यावी


  • जेव्हा तुम्ही लिंबू पाणी पिता त्यावेळी त्याचं तापमान अधिक नसावं

  • लिंबाचा रस पाण्यामध्ये नीट घोळवा. जेणेकरून त्याची आम्लता कमी होण्यास मदत होईल.

  • लिंबू पाणी प्यायल्यानंतर तुम्ही तातडीने ब्रश करू नका. 

  • लिंबू सरबत प्यायल्यानंतर तुम्ही 30 मिनिटांनी ब्रश करू शकता


दररोज लिंबूपाणी प्यायल्याने हे त्रास होऊ शकतात


छातीत जळजळ होऊ शकते


लिंबू अ‍ॅसिडीक फ्रुट आहे आणि त्याचं जास्त सेवन केल्यास याने छातीत जळजळ होण्याची समस्या होऊ शकते. जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर जास्त लिंबू पाणी पिणे टाळा. 


दातांचं नुकसान


लिंबूमध्ये असलेल्या अ‍ॅसिडमुळे दातांचं नुकसान होतं. यामुळे नॅच्युरल श्युगर लेव्हलमध्ये कमतरता येते आणि मग दात खराब व्हायला लागतात. त्यामुळे जर जास्त लिंबू पाण्याचं सेवन केल्यास दातांमध्ये सेंसिटीव्हीटी आणि कॅव्हिटीची समस्या वाढू शकते.