दिवसभरात नकळत घडणार्या या `६` चूका वाढवतात अॅक्नेचा त्रास
चेहरा नियमित स्वच्छ केला,आहाराचं पथ्यपाणी सांभाळलं तरीही अनेकांच्या चेहर्यावर अॅक्नेचा त्रास सातत्याने वाढतो. अशाप्रकारे अॅक्नेचा त्रास वाढण्यामागे अनेक कारणं असू शकतात. त्यापैकी नकळत तुम्ही या `६` चूका करत असाल तर वेळीच काळजी घ्या.
मुंबई : चेहरा नियमित स्वच्छ केला,आहाराचं पथ्यपाणी सांभाळलं तरीही अनेकांच्या चेहर्यावर अॅक्नेचा त्रास सातत्याने वाढतो. अशाप्रकारे अॅक्नेचा त्रास वाढण्यामागे अनेक कारणं असू शकतात. त्यापैकी नकळत तुम्ही या '६' चूका करत असाल तर वेळीच काळजी घ्या.
चेहर्याला हात लावणं -
तुम्हांला सतत चेहर्याला हात लावण्याची सवय आहे का ? नकळत अनेकांचा हात चेहर्याला लागतो. पण त्यामुळे अॅक्ने आणि ब्रेकआऊट्सचा त्रासही वाधतो हे तुम्हांला ठाऊक आहे का ? हातावरील छुपे बॅक्टेरिया चेहर्यावर जातात परिणामी अॅक्नेचा त्रास अधिक वाढतो.
वर्क आऊटनंतर आंघोळ न करणं
व्यायामानंतर आंघोळ करायला तुम्ही कंटाळा करत असाल तर सहाजिकच तुम्ही त्वचा आणि सौंदर्य धोक्यात घालत आहात. व्यायामादरम्यान येणारा घाम तुमच्या त्वचेचे नुकसान करते. त्यातून बॅक्टेरियांची वाढ होते.
व्हे प्रोटीन्स
आहारात व्हे प्रोटीन्स अधिक प्रमाणात घेतल्यास त्वचेचे नुकसान होते. अनेकदा व्हे प्रोटीनची पातळी वाढल्यास स्वादूपिंडातून वाहणार्या इन्सुलिनवर त्याचा परिणाम होते. परिणामी अॅक्नेचा त्रासही वाढतो.
फोनची स्क्रिन
प्रामुख्याने तेलकट त्वचा असणार्यांमध्ये सेलफोनचा अधिक वापर त्रासदायक ठरतो. स्क्रिनवरील बॅक्टेरिया छुप्या पद्धतीने त्वचेवर वाढतात. त्वचेवर अॅक्ने आणि ब्रेकआऊट्सचा त्रासही वाढतो.
अस्वच्छ कुशन कव्हर
कुशन कव्हर स्वच्छ न धुतल्यास त्वचेवर त्याचा परिणाम होतो. सुती काव्हरचा वापर टाळा. सुती कपडामध्ये तेल, घाम शोषलं जाते. परिणामी त्यावर फंगस, बॅक्टेरिया वाढतात. अशाप्रकारची अस्वच्छ कुशन कव्हर वापरल्यास त्वचेला नुकसान होऊ शकते.