मुंबई : बराच वेळ लॅपटॉप किंवा मोबाईल स्क्रीनवर नजर असल्याने डोळ्यांवर ताण येतो. खासकरुन रात्रीच्या वेळी मोबाईलमधून येणारी निळी लाईट डोळ्यांसाठी अधिक त्रासदायक असते. यामुळे डोळ्यात जळजळ होणे, थकणे, डोळ्यांना खाज येणे, डोळे खुखणे अशा समस्या उद्भवतात. तज्ज्ञांच्या मते, बराच वेळ मोबाईल पाहिल्याने डोळ्यांच्या पापण्या कमी वेळा उघड झाप करतात. ज्यामुळे नंतर डोळ्यांना अस्पष्ट दिसू लागतं.


अंतर ठेवा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॅपटॉप आणि मोबाईल वापरताना डोळ्यांवर ताण येत असल्याने यामध्ये जवळपास 25 इंचाचं तरी अंतर असलं पाहिजे. यामुळे डोळ्यावर कमी ताण येतो.


20 सेंकदचा नियम


जेव्हा तुम्ही काम करत असाल तेव्हा 20 फुटावर असलेल्या वस्तूला पाहिलं पाहिजे. कमीत कमी 20 सेंकद ती वस्तू पाहात राहा. त्यानंतर नजर दुसरीकडे वळवा. त्या वस्तूकडे ही 20 सेंकद पाहा. नंतर पुन्हा कामाला सुरुवात करा. 


ब्राइटनेस कमी ठेवा.


अनेकदा काम करताना लोकं लॅपटॉपचा ब्राईटनेस वाढवून ठेवतात. मोबाईल वापरताना तो नाईट मोडमध्ये वापरतात. यामुळे डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे ब्राईटनेसचं योग्य संतुलन ठेवलं पाहिजे.


ह्यूमिडिफायरचा वापर


जर तुम्ही बराच काळापासून डोळ्यांच्या समस्येपासून त्रस्त आहात. तर ह्यूमिडिफायरचा वापर करा. यामुळे डोळे कोरडे झाले असल्यास आराम मिळतो.


डोळ्यांचा ड्रॉप


डोळ्यांचा ताण कमी करण्यासाठी तुम्ही ड्रॉपचा वापर करु शकतो. पण कोणता ड्रॉप वापरावा याबाबत डोळ्यांच्या डॉक्टरकडून माहिती घ्या. 


सूचना : डोळ्यांचा इतर कोणताही त्रास असला तर आधी डॉक्टरला दाखवणं महत्त्वाचं आहे. कोणतीही गोष्ट करताना तज्ज्ञांचं मत घेणं महत्त्वाचं असतं.