Fact Check | कोल्ड्रिंकवाली मॅगी घेईल तुमचा जीव?
कोल्ड्रिंकवाली मॅगी खात असाल तर वेळीच सावध व्हा. कारण, ही कोल्ड्रिंकवाली मॅगी खाणं आरोग्यास हानिकारक ठरू शकतं असा दावा करण्यात आलाय.
अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : तुम्ही जर कोल्ड्रिंकवाली मॅगी खात असाल तर वेळीच सावध व्हा. कारण, ही कोल्ड्रिंकवाली मॅगी खाणं आरोग्यास हानिकारक ठरू शकतं असा दावा करण्यात आलाय. त्यामुळे आम्ही या दाव्याची पोलखोल केली. मग काय सत्य समोर आलं पाहुयात. (fact check viral polkhol eating maggie with a cold drink can be life threatening see what truth what false)
दावा आहे की, कोल्ड्रिंकवाली मॅगी खाणं जीवघेणं ठरू शकतं. या दाव्यासोबत एक व्हीडिओही व्हायरल होतोय. कमी वेळेत कोल्ड्रिंकवाली मॅगी कशी बनवायची हे दाखवण्यात आलंय. पण, खरंच ही कोल्ड्रिंकवाली मॅगी खाणं कितपत योग्य आहे?
अनेकजण चटकदार अशी मॅगी खात असतात. पण, व्हीडिओतील कोल्ड्रिंक मॅगी खाणं आरोग्यास उपयुक्त आहे का? याची आम्ही पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर आहारतज्ज्ञांना भेटले. त्यांना व्हायरल व्हीडिओ दाखवला. याबाबत अधिक माहिती जाणून घेतली.
पडताळणीत काय पोलखोल झाली?
मॅगी खाल्ल्याने आरोग्यास धोका नाही. मॅगीत कोल्ड्रिंक घालून खाल्ल्याने पोट बिघडू शकतं. अॅसिडिटी, अपचन असे त्रास होऊ शकतात.
व्हीडिओत रेसिपी पाहून अनेकजण असे प्रयोग करत असतात. त्यामुळे अशा रेसिपीज करण्यापूर्वी विचार करा. कारण, सोशल मीडियावर पोट बिघडवणाऱ्या रेसिपीज दाखवून तुम्हाला आजारी पाडण्याचाही कट असू शकतो.