Heart Attack : हिवाळ्यात वाढतो हार्ट अॅटॅकचा धोका?
हा दावा केल्यानं हार्ट रुग्णांच्या (heart attack) मनात भीतीचं वातावरण आहे.
अमर काणे, झी मीडिया, नागपूर : थंडीत (Winter) हार्ट अॅटॅकचा (Heart Attack) धोका अधिक आहे असा दावा करण्यात आलाय. हा दावा केल्यानं हार्ट रुग्णांच्या मनात भीती निर्माण झालीय. पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का? याची आम्ही पडताळणी केली. त्यानंतर काय पोलखोल झाली चला पाहुयात. (fact check viral polkhol heart attack chance incresed during winter season know what true)
दावा आहे की, हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका अधिक आहे. पहाटे थंडी जास्त असल्यास रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे अॅटॅक येण्याच्या प्रमाणात वाढ होते. हा दावा केल्यानं हार्ट रुग्णांच्या मनात भीतीचं वातावरण आहे. पण, या दाव्यात तथ्य आहे का? याची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली. याबाबत अधिक माहिती हार्ट स्पेशालिस्ट देऊ शकतात. त्यामुळे याची अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय पोलखोल झाली पाहुयात.
व्हायरल पोलखोल
थंडीत हार्ट अॅटॅकचा धोका अधिक असतो. रक्तवाहिनी बंद होऊन हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोकची शक्यता. हिवाळ्यामध्ये हार्मोनल चेंजेस होतात. ब्लॉक असलेल्या रुग्णांनी थंडीत काळजी घ्यायला हवी. धुम्रपान, मद्यपान करू नये. थंडीत हार्ट रुग्णांनी अधिक काळजी घ्यायला हवी. तळलेले पदार्थही जास्त खाऊ नये. हार्ट रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. थंडीत रक्तवाहिनी अकुंचन पावत असल्याने हार्ट अॅटॅक येऊ शकतो हा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरला.