दात घासले नाहीत तर हार्ट अटॅकचा धोका? दात न घासणं जिवावर बेतू शकतं?
ह्रदयरोगापासून वाचायचं असेल तर सतत ब्रश करावा लागणार?
अरुण म्हेत्रे, झी मीडिया पुणे : वाघ कधी दात घासतो का? असं म्हणत अनेक लोकं दिवसातून किमान दोनवेळाही दात घासणं (Teeth Brush) टाळतात. पण आता दात न घासणं तुमच्या जिवावर बेतू शकतं. कारण दात घासले नाहीत तर बॅक्टेरियामुळे (Bacteria) हार्ट अटॅक (Heart Attack) येईल असा दावा केला जातोय. नेमका काय दावा केला जातोय तो आधी बघुयात
दात घासले नाही तर हार्ट अटॅक?
- दातांच्या अस्वच्छतेमुळे रक्तात बॅक्टेरिअल इन्फेक्शनचा धोका वाढतो
- दातांच्या बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे ह्रदयाला धोका आहे
- हे बॅक्टेरिया ह्रदयाजवळच्या रक्तवाहिन्यांना दाबतात
- रक्तवाहिन्या दबल्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आमच्या पडताळणीत काय समोर आलं ते पाहुयात, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार
काय आहे व्हायरल सत्य?
- दातांच्या स्वच्छतेचा संबंध कुठे ना कुठे ह्रदयाच्या आरोग्याशी आहे.
- पण त्यामुळे हार्ट अटॅक येईल असं नाही
- दातांचा संबंध थेट पोटाच्या विकारांशी असतो, तसंच पचनाशी असतो.
त्यामुळे दातांची नीट काळजी घ्यायलाच हवी. दातांची काळजी न घेणं जीवघेणं ठरु शकतं.