Navratri 2022 : शारदीय नवरात्र (Shardhiy Navaratri) हा सण भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.  हा सण  वर्षांतून दोनदा अर्थात चैत्र (मार्च-एप्रिल) आणि शारदा (ऑक्टोबर-नोव्हेंबर) या महिन्यात साजरा केला जातो. गणेशोत्सवानंतर शारदीय नवरात्र सुरु होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वर्षी शारदीय नवरात्रीला (Shardhiy Navaratri)  हा सण 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरपर्यंत साजरी केली जाईल. या 9 दिवसांमध्ये देवीची आराधना, पूजा आणि उपवास (Fast) केले जातात. या दिवसांमध्ये ज्या लोकांचे उपवास असतात त्यांनी सक्रिय राहण्यासाठी मखाना ड्राय फ्रूट्स नमकीन खाऊ शकतात. (Fasting on Navratri What to eat)


त्यासाठी मखाना ड्रायफ्रुट्स (Makhana Dry Fruits) नमकीनची रेसिपी (Recipe) जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आजचा लेख याच विषयावर आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे मखाना ड्राय फ्रूट नमकीन रेसिपी काय आहे ते सांगणार आहोत.


आणखी वाचा... Navratri Festival 2022 : यंदा नवरात्रीचे खास वैशिष्ट्य काय आहे?, नऊ रंगही जाणून घ्या


मखाना ड्राय फ्रूट नमकीन रेसिपी -
माखना - 100 ग्रॅम
काजू - १ कप
चूर्ण साखर - 2 टेस्पून
लाल मिरची - १/२ टीस्पून
खरबूज बिया - 1/2 कप
मनुका - 1 कप
शेंगदाणे - 1 कप
काळी मिरी - 1 टीस्पून
चवीनुसार रॉक मीठ
बदाम - १ कप
नारळाचे पातळ आणि लांब तुकडे - १ कप
कढीपत्ता - 7-8
हिरवी मिरची - ३
भाजलेले जिरे - 1 टीस्पून
देसी तूप - ३ चमचे


मखाना ड्राय फ्रूट नमकीन कसा बनवायचा?


1. सर्वात आधी एक कडई घेऊन त्यात देशी तूप टाका आणि आता शेंगदाणे घालून मंद आचेवर भाजून घ्या आणि एका भांड्यात काढा.


2. त्याच कडईत बदाम, काजू आणि खरबूजच्या बीया हे देखील मंद आचेवर भाजून एका प्लेट मध्ये काढा.


3. आता बेदाणे काही सेकंद भाजून  घ्या, नंतर खोबऱ्याचे तुकडेही भाजून घ्या आणि नंतर एका भांड्यात काढा.


4. आता त्याच कढईत तूप टाका, त्यात हिरवी मिरची, कढीपत्ता घाला आणि काही सेकंदांनी मखणा घालून भाजून घ्या.


5. मखणा भाजून झाल्यावर त्याच कडईत सगळे ड्राय फ्रूट परत भाजून घ्या.


6. आता मिश्रणात लाल तिखट, खडे मीठ, काळी मिरी आणि भाजलेले जिरे घालून मिक्स करा.


7. हे सगळं मिश्रण एका प्लेट मध्ये काढून खाऊ शकता.


आणखी वाचा... देवाजवळ दिवा लावताना सावधान! छोटीशी चूक बेतू शकते जीवावर... हा Video एकदा पाहाच