Fat burning juice : पोटावरचा घेर कमी करायचाय,`हे` Vegetable juice पिऊन बघा
Fat burning juice : `या` भाज्यांचे ज्यूस पिऊन तुम्ही चुटकीसरशी वजन कमी करू शकता, आताच प्यायला सुरु करा
Fat burning juice : दिवाळीनंतर गोड धोड आणि फराळ खाल्ल्याने अनेकजणांचे वजन (weight gain) वाढते. हे वजम नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेकजण जीम, योगा अथवा डायटींग सुरु करता. मात्र सकाळी उठण्याचा कंटाळा आणि इतर काही गोष्टींमुळे हे शक्य होत नाही. मात्र जीमही न करता तुम्हाला वजन कमी करता येणार आहे. यासाठी तुम्हाला काही भाज्यांचे ज्यूस (vegetable juice) प्यावे लागणार आहेत. हे ज्यूस पिऊन तुमच वजन नियंत्रणात येणार आहे.
हे ही वाचा : लघवीतून घाणेरडा वास येतोय, तुम्हाला 'या' गंभीर आजाराचा धोका
पालकचा ज्यूस
पालकचा ज्यूस (spinach juice) वजन कमी करण्यात खुप फायदेशीर ठरतो. त्यामुळे पालकचा ज्यूस प्या, यामुळे तुमचे वजन लवकर कमी होईल. फक्त त्याचे नियमित सेवन केले पाहिजे. जर नियमित सेवन केले तर नक्कीच फरक पडेल. पालकच्या (spinach juice) पोषक तत्वांबद्दल बोलायचे झाले तर त्यात लोहाचे स्रोत, जीवनसत्त्वे ए, बी, सी, ई, कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फरस, तांबे, फोलेट, प्रथिने, फायबर आढळतात.
हे ही वाचा : पाठदुखीचा त्रास होतोय,'हे' घरगूती उपाय करून बघा
गाजरचा ज्यूस
गाजरचा ज्यूस (carrot juice) देखील वजन नियंत्रणात आणण्यात खुप मदतगार ठरतो. गाजराचा ज्यूस फक्त तुमचे वजन कमी करत नाही तर तुमच्या केस, त्वचा आणि डोळ्यांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. हे तुम्हाला जास्त खाण्यापासून देखील वाचवते. त्यात कॅलरीज, आहारातील फायबर, साखर, प्रथिने, कार्बोहायड्रेट, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन ए, सी आढळतात.
कारल्याचा ज्यूस
कारल्याचा ज्यूस (bitter gourd juice) वजन कमी करण्यात फायदेशीर ठरतो. कारल्याचा ज्यूस आपल्याला हायड्रेट ठेवण्यास मदत करतो.हा ज्यूस तुमच्या पोटाची चरबी कमी करण्याचे काम करते. या ज्यूसमध्ये मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी आढळतात जे चयापचय मजबूत करण्यासाठी चांगले कार्य करतात.
दरम्यान वरील हे तीनही ज्यूस (vegetable juice) आजपासूनच प्यायला सुरूवात करा. हे ज्यूस पिल्यानंतर तुम्हाला नक्कीच फरक दिसून येईल.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)