मुंबई : हिवाळ्यात पाठदुखीचा त्रास जाणवतो. या वेदनेमुळे उठणे-बसणे, अगदी झोपणेही कठीण होऊन बसते. जे लोक ऑफिसमध्ये किंवा घरी एकाच ठिकाणी बराच वेळ बसून राहणाऱ्यांना शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना होतात. आहारात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे ही समस्या उद्भवते.अशा परिस्थितीत काही टिप्स सांगत आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही पाठदुखी पासून सुटका करून घेऊ शकता.
एक कपापेक्षा जास्त पाणी घ्या आणि ते गरम करून घ्या.आल्याचे बारीक तुकडे करा आणि ते पाण्यात मिसळून उकळून गाळून घ्या. चवीसाठी तुम्ही या चहामध्ये मध टाकू शकता. हे प्यायल्याने पाठदुखीपासून आराम मिळतो. हा आल्याचा चहा प्यायल्याने पाठदुखीपासून आराम मिळण्याची शक्यता असते.
हळदीचे दूधही (Turmeric Milk) पाठदुखीवर फायदेशीर ठरू शकते. मात्र हिवाळ्यात दूध पिण्याबाबत अनेक मतंमतांतरे आहेत.
एका जागी जास्त वेळ बसल्याने किंवा पडून राहिल्याने पाठदुखीचा त्रास जास्त जाणवतो. त्यामुळे हा त्रास जाणवू नये म्हणून हालचाल करायला हवी. विशेष म्हणजे बसून काम करणाऱ्यांनी दर 2 ते 3 तासांनी हालचाल करावी. शक्य तितकी कामे बसून करण्याऐवजी उभ्या राहून करावीत.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)