Winter Foot Care: थंडीच्या दिवसात टाचदुखीचा त्रास जाणवतोय? कशी घ्याल पायांची काळजी?
Winter Foot Care: कोरड्या वातावरणामुळे हिवाळ्यात पायांना भेगा पडणं, स्ट्रेस फ्रॅक्चरच्या समस्या आढळून येतात. हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी झाल्यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी होऊन हाडांची डेंसिटी कमी होते.
Winter Foot Care: हिवाळ्यात पायांची निगा राखणं महत्त्वाचं असतं. कोरड्या वातावरणामुळे हिवाळ्यात पायांना भेगा पडणं, स्ट्रेस फ्रॅक्चरच्या समस्या आढळून येतात. हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी झाल्यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी होऊन हाडांची डेंसिटी कमी होते.
नवी मुंबईच्या रूग्णालयातील ऑर्थोपेडिक्स आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ प्रमोद भोर म्हणाले, एखाद्याची हाडे नाजूक असतील तर अशा व्यक्तींना फ्रॅक्चर किंवा दुखापतीची शक्यता अधिक असते. थंड हवामानात आधीपासूनच असलेल्या समस्या आणखी वाढवू शकतात. यामुळे नवीन समस्यांना कारणीभूत ठरतात.
हिवाळ्यात वारंवार उद्भवणारी आणखी एक समस्या म्हणजे प्लांटर फॅसिटायटिस (टाचदुखी). थंड वातावरणामुळे पायातील टिश्यू आकुंचन पावतात, ज्यामुळे पायाच्या संवेदनशील भागांवर अतिरिक्त ताण पडून जळजळ आणि अस्वस्थता निर्माण होते.
पायांची निगा राखण्यासाठी खास टिप्स
चांगल्या सपोर्टसह असलेल्या चपलांचा वापर केल्याने पायांना आधार मिळण्यास मदत होईल. आपल्या दैनंदिन दिनचर्यामध्ये स्ट्रेचिंग व्यायाम समाविष्ट केल्याने लवचिकता सुधारण्यास मदत होते आणि प्लांटर फॅसिटायटिस सारख्या वेदनादायक परिस्थिती विकसित होण्याचा धोका कमी होतो.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्ट्रेचिंग आणि व्यायाम करा.
स्ट्रेंथ ट्रेनिंग, व्यायामापूर्वी वॉर्म अप करायला विसरु नका. पडून अपघात होण्याची ट शक्यता कमी करण्यासाठी शारीरीक संतुलन सुधारण्याचा प्रयत्न करा.
दिर्घकाळासाठी अत्यंत थंड वातावरणात राहू नका. यामुळे दुखापती तसेच पायांमधील रक्ताभिसरणात अडचणी येऊ शकतात.
हिवाळ्यात पायांच्या समस्यांकडे लक्ष देणे हे पायांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी गरजेचे आहे. तुमचे पाय हायड्रेटेड ठेवणे, योग्य पादत्राणांचा वापर करणे आणि नियमित स्ट्रेचिंग करणे तसेच सक्रिय जीवनशैली बाळगणे गरजेचे आहे.