Change Unhealthy Habbits: बदलती जीवनशैली, आपली काम करण्याची पद्धत, वाढलेलं टेन्शन यामुळे तुम्हाला अनेकदा रेस्टलेस वाटू शकतं. तुमचं मानसिक संतुलन जास्तच बिघडलं तर तुम्हाला डिप्रेशनचाही सामना करावा लागू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामुळे पारिवारिक कलह, नात्यांमध्ये समस्या, आर्थिक संकटं सतावू शकतात. मात्र, अनेकदा तुमच्या सवयीच तुम्हाला रेस्टलेस होणं, बेचेन होण्याकडे ढकलत असतात.


याबाबत GIMS रुग्णालयातील डायटिशियन डॉक्टर आयुषी यादव यांनी आपल्या काही सवयी कशा बदलायला हव्या याबाबत माहिती दिली आहे.


जाणून घेऊयात अशा काही सवयींबाबत ज्या तात्काळ सुधारणं अत्यंत गरजेचं आहे.  


प्रोसेस्डस फूड खाणं बंद करा


इतर तंत्रज्ञानाबरोबर खान पान तंत्रज्ञानानातही मोठे बदल होत आहेत. यामुळे तुम्हाला बाजारात विविध प्रकारचं प्रोसेस्ड फूड सहज मिळतं. मात्र प्रोसेस केलेलं आणि प्रिझर्व्हेटिव्ह टाकलेले अन्नपदार्थ खाणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. अशा गोष्टी पचनास जड जातात. यामुळे तुमच्या पोटात सूज येऊ शकते. म्हणून अशा गोष्टींपासून जरा दूर राहा. 


स्वीट ड्रिंक्सपासून लांब राहा 


गोड पदार्थ आपल्याला प्रचंड आकर्षित करतात. मात्र, अशा गोष्टी आरोग्यासाठी अजिबात फायदेशीर नसतात. सातत्याने गोड पदार्थ सेवन करत असाल, तर रक्तातील साखर वाढते. यामुळे तुम्हाला टेन्शन येणं किंवा रेस्टलेस वाटू शकतं. म्हणूनच तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदला आणि स्वीट ड्रिंक्सपासून चार हात लांब राहा.


सिगारेट सोडा 


सिगारेटमध्ये न्यूरोटॉक्सिन्स असतात. त्यामुळे सिगारेटचा थेट परिणाम तुमच्या मेंदूवर होत असतो. त्यामुळे तुम्हाला जर सिगारेट पिण्याची सवय असेल तर ती तातडीने सोडा. सिगारेटची तलफ रेस्टलेस करू शकते. 


दारूला करा बाय बाय


तरुणांमध्ये मद्यप्राशनाचं प्रमाण वाढतंय. अनेकजण स्वतःला ट्रेंडी दाखवण्यासाठी, शायनिंग मारण्यासाठी मद्यसेवन करतात. अनेकांना यामुळे आपलं टेन्शन दूर होतं असं वाटतं. मात्र, वारंवार मद्यप्राशन करण्याचे दूरगामी परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यवर होत असतात. मद्यातील केमिकल्स तुमची चिंता वाढवतात. दारूने अनेकदा तुम्हाला छान, रिलॅक्स वाटत असेल. मात्र यामुळे तुमच्या नसा कमजोर होऊ शकतात. म्हणूनच शक्य तितक्या लवकर दारूला करा बाय बाय. 


feeling restless feeling anxious quit these 4 habbits and live healthy life