मुंबई : शारीरिक आरोग्यासाठी तसंच त्वचेसाठी पाणी पिणं फार गरजेचं आहे. शरीर हायड्रेट ठेवण्याचं महत्त्वाचं काम पाणी करतं. त्यामुळे पाणी हे प्यायलंच पाहिजे. मात्र जर तुम्ही सतत पाणी पीत असाल तर सावधान व्हा. कारण सतत आणि अतिप्रमाणात पाणी पिणं हे गंभीर आजाराचं एक लक्षण असू शकतं. एक व्यक्ती दिवसाला 3-4 लिटर पाणी पिऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ज्ञांच्या मताप्रमाणे, जास्त काम केल्याने किंवा उन्हाळ्याच्या दिवसांत जास्त पाण्याची गरज भासू शकते. मात्र अधिक प्रमाणात पाणी पिणं आणि अतिरीक्त पाणी पिणं हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. सतत पाणी पिणं या गंभीर आजारांचं लक्षणं असू शकतं.


'पॉलीडिप्सिया'


जर तुम्हाला खूप जास्त तहान लागत असेल तर वैद्यकीय भाषेत याला 'पॉलीडिप्सिया' असं म्हटलं जातं. 'पॉलीडिप्सिया' या अवस्थेमध्ये एखादी व्यक्ती गरजेपेक्षा जास्त पाणी पितं. गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने शरीरात सोडियमची कमी निर्माण होते. 


डिहायड्रेशनचे संकेत


तुम्हाला सतत तहान लागत असेल तर तुमचं शरीर डिहायड्रेट असल्याचं हे लक्षणं आहे. डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमी निर्माण होणं. अन्नातून विषबाधा, हीटवेव, डायरिया, इन्फेक्शन किंवा तापामुळे शरीर डिहायड्रेट होऊ शकतं. डिहायड्रेशनमध्ये तोंड कोरडं पडतं आणि थकवा जाणवू लागतो. 


डायबेटीजचं लक्षण


सतत लहान लागण हे मधुमेहाचं ही लक्षण असू शकतं. डायबेटीज असल्यास रक्तातील साखरेची मात्रा वाढते. ही अतिरीक्त साखर तिच्या क्षमतेप्रमाणे लघवीवाटे सतत पाणी बाहेर काढून टाकते. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊन तुम्हाला सतत तहान लागते.